भाजपा दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी निलेश थोरे यांची नियुक्ती
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १७- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे यांची निवड जाहीर केली आहे.
आक्रमक युवा नेतृत्व असलेले निलेश थोरे यांनी आजवर अनेक आंदोलन, सामाजिक उपक्रम राबविले आहेत. दक्षिण रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार पोहचविण्यासाठी खंद्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर पक्ष वाढीच्या दृष्टीने जबाबदारी देऊ केली आहे. २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून रायगड लोकसभा मतदार संघातील दक्षिण रायगड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे कार्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. निलेश थोरे हे यापूर्वी शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते. शेतकरी कामगार पक्षाला वर्धापनदिनीच खिंडार पाडून श्रीवर्धन विधानसभेतील जवळपास ८०% शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते युवानेते निलेश थोरे यांच्यासमवेत भाजपा मध्ये प्रवेशकर्ते झाले. दक्षिण रायगडमध्ये शेकापच्या एकमेव नगरसेविका व निलेश थोरे यांच्या बहीण ममता थोरे यांनीदेखील त्यांच्या नेतृत्वात कमळ हाती घेतला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवीशेट पाटील, आ. महेश बालदी, भाजप दक्षिण रायगड जिल्हा ध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे माणगाव आणि दक्षिण रायगड जिल्हयात भाजपच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे. ओबीसी जनमोर्चाचे देखील थोरे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडत आहेत. दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे यांची निवड जाहीर करण्यात आल्या नंतर संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दक्षिण रायगड जिल्हयात युवा मोर्चाची ताकद मजबूत करून युवा संघटन उभारण्यात येणार असल्याचे निलेश थोरे यांनी सांगितले.



0 टिप्पण्या