जेष्ठ शिवसैनिक आत्माराम शेडगे यांना मातृशोक
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २६- माणगांव तालुक्यातील जिते ग्रामपंचायत हद्दीतील मौजे साखळेवाडी गावचे ग्रामस्थ तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जेष्ठ व कडवट शिवसैनिक आत्माराम परशुराम शेडगे यांच्या मातोश्री शांताबाई परशुराम शेडगे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने पनवेल येथे दि.२० सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताचा साखळेवाडी ग्रामस्थ व शेगडे कुटुंबियांवर एकच शोककळा पसरली.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना ,जावई, नातवंड, परतवंड असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी दि. २९ सप्टेंबर व उत्तरकार्य रविवार दि.१ आक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या मूळ घरी साखळे वाडी येथे होतील असे शेडगे परिवार व भावकी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.



0 टिप्पण्या