जय मल्हार रायगड समाज सेवा मंडळ ठाणे कडून अनाथ आश्रमास शैक्षणिक साहित्य वाटप.
मुंबई-दि. ७- सर्वाना समान शिक्षणाचा अधिकार असलाच पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण हे मिळालेच पाहिजे आणि समाजातील दुर्बल घटकातील आर्थिक मागास आणि अनाथ विद्यार्थ्यांना देखील शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण भासु नये हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्ह्यातील मुंबई ठाणे व मुंबई उपनगरस्थित असणाऱ्या नागरिकांच्या व नव्याने निमिर्ती झालेल्या जय मल्हार रायगड समाज सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने साई आधार आश्रम वसई, दिल खुश आश्रम वसई, स्नेहा सदन आश्रम तसेच मोन्फोर्थ आश्रम मध्ये भेट देऊन अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मुलांनी ह्या उपक्रमाचा भरभरून आनंद घेतला तसेच उपस्थित शिक्षक पुष्पलता मॅडम, विशाल सर, सिसिलिया मॅडम व जॉश्फ सर यांनी सदर अनाथ आश्रमाची माहिती दिली व मुलांची माहीती दिली. व जय मल्हार रायगड समाज सेवा मंडळाचे आभार मानले.
हा उपक्रम मंडळाचे अध्यक्ष राजू हिरवे व सचिव प्रकाश खरात यांच्या अतोनात प्रयत्नाने राबविण्यात आला. तसेच रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी व इतर मित्र मंडळींनीही हया कार्यक्रमसाठी सहकार्य केले. त्यांचे आभार मंडळाचे अध्यक्ष राजू हिरवे व सचिव प्रकाश खरात यांनी मानले. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मंडळातील उपस्थित असणारे व अप्रत्यक्ष रित्या मदत लाभलेले सदस्य यामध्ये सुरेश ढवळे, रमेश हिरवे, अक्षय हिरवे, नेताजी झोरे, सौरभ हिरवे, सनी हिरवे यांचेही अनाथ आश्रम व्यवस्थापनातील सर व मॅडम यांनी आभार मानले.




0 टिप्पण्या