युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वहया वाटप कार्यक्रम

 युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वहया वाटप कार्यक्रम

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ७- भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळ विळे संचलित हिरालाल महादेव मेता माध्यमिक विदयालय विळे व स्वा. स. ध. भि. मोदी उच्च माध्यमिक विदयालय विळे या विदयालयात सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी रोजी शाळेचे माजी विदयार्थी, सामाजिक कार्यकर्ते , युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश अनिल नलावडे यांच्या वाढदिवसा निमित्त किशोर सुहालाल बाफना शेट नाशिक यांच्या मार्फत विदयालयातील सर्व विदयाथ्याना वहया वाटप करण्यात आल्या. 

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष  सुभाष हिरालाल मेता, उपाध्यक्ष  प्रकाश तुळशीदास मेहत, कार्याध्यक्ष  पांडूरंग कोंडू नलावडे, माजी सरंपच ग्रामपंचायत भागाड  प्रकाश जंगम, सामाजिक कार्यकता संतोष पोळेकर,  तुषार कदम, राज शिंदे, तुळशीराम धावडे, शशिकांत बामुगडे,  रविंद्र दगडे, संकेष कदम, रामदास उभे उपस्थित होते. तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विळे, सणसवाडी, कोंडेथर येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. कुशिरे मॅडम  यांनी केले. कार्यक्रमात सुदर्शन जाधव सर यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे अविनाश नलावडे यांनी विदयार्थ्यानां मार्गदर्शन करुन विदयार्थ्यांना ओळखपत्र मोफत देण्याचे आश्वासन देउन विदयार्थ्यानां खाउ वाटप करण्यात आला.  प्रकाश जंगम यांनी विदयालयास शालेय वस्तू देण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमास विदयालयातील सर्व विदयार्थी सर्व शिक्षक/शिक्षकेतत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता विदयालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र ठाकूर सर यांनी सर्वांचे आभार मानून केली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या