निलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणी माणगाव तालुका समस्त नाभिक समाज आक्रमक

 निलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणी माणगाव तालुका समस्त नाभिक समाज आक्रमक

निलिमा चव्हाण संशयास्पद मृत्युप्रकरणी समस्त माणगांव तालुका नाभिक समाजाचे प्रांताधिकारी यांना निवेदन

निलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यूकरणी न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरू- माणगाव तालुका समस्त नाभिक समाजाचा इशारा.


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ७- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ओंबळी गावची २४ वर्षीय युवती निलिमा सुधाकर चव्हाण हीचा संशयास्पद मृत्यू आणि विद्रुप प्रकारे दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीत सापडलेला मृतदेह याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात समस्त नाभिक समाजाकडून तीव्र संताप आणि संतापाचा उद्रेक म्हणून निषेध मोर्चे आणि आंदोलने उफाळून येत आहेत. मृतदेह सापडल्या नंतर १० दिवस उलटून देखिल निलिमा चव्हाण प्रकरणाचा तपास लागत नाही. यामुळे रत्नागिरी रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नाभिक समाज संतापला आहे. विविध जिल्हा व तालुका स्तरावर नाभिक समाजाकडून प्रशासनाला निवेदने देण्यात येत आहेत. अशाचप्रकारे  रायगड जिल्हा नाभिक समाज अध्यक्ष सुदाम शिंदे व दिनेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि रायगड जिल्हा नाभिक समाज विश्वस्त दत्तात्रय(भाऊ) पांडे व माणगाव तालुका नाभिक समाज बांधव यांच्या उपस्थितीत ७ आगस्ट रोजी माणगांव तालुक्यातील समस्त नाभिक समाज बांधव व भगिनींकडून माणगांव तालुका प्रांताधिकारी संदीपान सानप व माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निलीमा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात असा आशय नमूद करण्यात आला आहे की, निलिमा सुधाकर चव्हाण मूळ गांव ओमळी ता. चिपळूण ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दापोलीहून ती ओमळी ता. चिपळूण येथे येण्यास निघाली ती तेथून बेपत्ता होती. व त्यानंतर दिनांक १ ऑगस्ट दुपारी दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह मिळाला. या दरम्यान खाली नमुद केलेल्या घटना किंवा नोंदी या त्या मुलीचा घातपात झाल्याच्या बाबतीत आमची सर्व समाज बांधवाची खात्री आहे. त्यामध्ये

१) सदर मुलगी कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही उच्चशिक्षित, सद्वर्तनी मुलगी होती. ती कोणत्याही वाईट चालीची नव्हती.

२) सदर दिवशी ती दापोलीहून खेड येथे (एस.टी. स्टॅडला) गेल्याचे सी. सी. टिव्हित दिसत आहे. त्याच बरोबर खेड मध्ये एका मुली बरोबर चिपळूणला जाणेच्या गाडीत बसल्याचे सुध्दा सी. सी. टिव्हित दिसत आहे. त्यानंतर ती बेपत्ता झाली.

३) तिचा मोबाईल बंद दाखवत होता.

४) मात्र तपास यंत्रणेने तपासात तिचे मोबाईल लोकेशन दि. २९.जुलै रोजीचे ठिक १२.०५ ला रात्री रेल्वे स्टेशन अंजनी येथे दाखवत होते. त्यानंतर मात्र बंद दाखवत होते. ते संशयास्पद होते.

५) त्या मुलीचा मृतदेह ज्या स्थितीत मिळाला त्यामध्ये पाण्यात मृतदेह राहिला तरी एवढया प्रकारे देहाचे डोक्यावरील केस पूर्ण नष्ट होणे, डोळयावरील भुवया पूर्ण नष्ट होत्या. हे सर्व मृतदेहाची ओळख पटू नये या दृष्टीने केलेली छेडछाड आहे, असे आमचे ठाम मत आहे.

६) त्या मुलीवर कोणत्यातरी अज्ञात इसमाने अथवा इसमांच्या समूहाने पाळत ठेवून अतिप्रसंग करून त्या नंतर तिची ही स्थिती करून तो मृतदेह पाण्यात फेकला असावा हे स्पष्ट जाणवत आहे. त्या दृष्टीने त्याचा वरिष्ठ यंत्रणा मार्फत कसून तपास होणे आवश्यक आहे.

तरी प्रशासकीय यंत्रणा आणि तपास यंत्रणा आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो की, आमच्या भगिनीच्या घातपाताचा त्या दृष्टीने दि. १२ ऑगस्ट पर्यंत तपास व्हावा व निलिमा चव्हाण वडील सुधाकर चव्हाण व कुटुंबीय यांना न्याय मिळावा. अन्यथा आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव संपूर्ण ताकदीनिशी दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस अधिक्षक रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार करीत आहोत. तरी महोदय  यांस विदीत व्हावे ही नम्र विनंती. या झालेल्या घृणास्पद प्रकाराचा आम्ही समस्त  रायगड जिल्हा नाभिक समाजाकडून  व समस्त माणगांव तालुका नाभिक सामाजा कडून जाहीर निषेध करीत आहोत. योग्य तपास न झाल्यास रत्नागिरी, रायगड सह संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहिल असा इशारा देखील समस्त माणगाव तालुका नाभिक समाजाकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

यावेळी माणगांव शहरातील कचेरी रोड प्रांताधिकारी कार्यालय माणगाव पोलीस ठाणे असा नाभिक समाज बांधवानी निलिमा चव्हाण ला श्रद्धांजली वाहून "निलिमा चव्हाण ला न्याय मिळालाच पाहिजे"! अश्या घोषणा देत मोर्चा काढला. व माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माणगाव तालुक्यातील गोरेगाव, साई, मोर्बा, इंदापूर, लोणेरे, निजामपूर विळे, माणगाव शहरातील नाभिक समाजाचे विविध पदाधिकारी, सदस्य व महिला भगिनी उपस्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या