एन.सी.सी. मध्ये सिद्धनेर्ली विद्यालयाचे घवघवीत यश.

 एन.सी.सी. मध्ये सिद्धनेर्ली विद्यालयाचे घवघवीत यश.

पोलीस प्रवाह न्यूज

सिद्धनेर्ली : दि. ८ -केंद्र सरकार मान्यताप्राप्त व 5 महाराष्ट्र  बटालिएन आर्मी विंग कोल्हापूर यांच्यावतीने एन.सी.सी.मान्यताप्राप्त 30 शाळांच्या A प्रमाणपत्र लेखी व प्रात्यक्षिक अशा स्वरुपाच्या परीक्षा विविध विभागात फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या.कागल विभागात श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल येथे एन.सी,सी. A प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आल्या होत्या.सदर परीक्षेत एन.सी.सी.मान्यताप्राप्त सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनि.काॕलेज सिद्धनेर्ली,श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल,शाहू हायस्कूल कागल,जवाहर नवोदय विद्यालय कागल या मान्यताप्राप्त शाळांचा समावेश होता.यामध्ये 5 महाराष्ट्र कोल्हापूर बटालिएनचे सुभेदार शेटके,हवालदार सर्जेराव जांभळे यांनी  निरीक्षक म्हणून काम पाहिले .या अ प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनि.काॕलेज सिद्धनेर्लीचा निकाल 100% लागला.एकूण 23 केडेट यामध्ये समावेश होते.यामध्ये 14मुले व 9 मुलींचा समावेश होता.यापैकी 16 जनांना अ श्रेणी प्राप्त झाली तर 7 जनांना ब श्रेणी प्राप्त झाली.नियमित सराव व कठोर परीश्रम यामुळे घवघवीत यश मिळाले असून पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

   यासाठी प्रेरणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष  मा.राजे समरजितसिंह घाटगे,मा.सुहासिनीदेवी घाटगे आईसाहेब,मा.नवोदिता घाटगे वहिनीसाहेब,सेक्रेटरी मा.एन.के.मगदूम गुरुजी शाहू कारखान्याचे संचालक सुनिल मगदूम सर व सर्व संचालक मंडळ मार्गदर्शक कर्नल वेस्वीकरसो मुख्याध्यापक श्री.ए.पी.सारंग सर,पर्यवेक्षक एस आर.मगदूम सर. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एन.सी.सी.विभाग प्रमुख श्री.विलास भानुसे सर व श्री.संदीप वर्णे सर यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या