कोल्हाण गावचे माणगांव पोलीसांनी केले कौतुक
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ७- माणगांव तालुक्यातील आदर्श गाव कोल्हाण गावातील तरूण मंडळ, ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ, महिला मंडळ यांच्या संयुक्त संकल्पनेतून कोल्हाण गावाने अनेक समाजोपयोगी कार्य केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी गावाचे कौतुक केले आहे.
एका अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक मदत करण्यात आले. तसेच गावात वेगवेगळ्या प्रकारे सार्वजनिक स्वच्छता अभियान. सोमजाई सांस्कृतिक नाच व भजन मंडळ यांच्या संकल्पनेतून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. महाड येथे झालेल्या अतिवृष्टीत पुरग्रस्ताना जीवनावश्यक किट देण्यात आले. गावात एकोप्याने सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात आली. तर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. या गावात तरुणांनी एकत्र येऊन क्रिकेट व कबड्डी क्लबची स्थापना करून अनेक गावातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन एक आदर्श निर्माण केले आहे. त्याच बरोबर शिक्षणाला महत्त्व देवून जिल्हा परिषद कोल्हाण शाळेचे आजी माजी गावातील विद्यार्थी एकत्र येऊन निधी गोळा करून शाळेला रंगरंगोटी करून सुसंगत करण्याचे भरीव कामगिरी या गावातील तरुणांनी केले आहे.
तसेच गावातील सोमजाई मातेच्या मंदिरासाठी क्रिकेट क्लब, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ यांच्या माध्यमातून सुशोभित करण्यात आले. तसेच गावातील गरजवंताना मदत करुन सहकार्याचा हात नेहमीच दिला जात असतो असे या गावातील ग्रामस्थांनी सांगितले. कोल्हाण गावात ग्रामस्थ तरुण मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ असे एकत्र येऊन गावाचा कायापालट करून एक आदर्श गाव निर्माण करुन माणगांव तालुक्यातील आपल्या गावचे नाव प्रथम क्रमांक येणारसाठी एकिचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे गावचे रहिवाशी गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हाण गावची माणगाव पोलीस वरिष्ठांनी दखल घेतली आणि ग्रामस्थांना गावामध्ये भेट देऊन गावाचा गावपण आणि सर्वांची एकजूट होऊन एक हात मदतीचा ही संकल्पना गावात राबवली गेली
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स. पो. नि. अस्मिता पाटील व माणगांव पोलीस स्टाफ यांनी कोल्हाण गावामध्ये जाऊन कौतुकाची थाप दिली. सर्वाच अभिनंदन केले तर इतर सार्वजनिक उपक्रमाबाबत गावाची स्तुति केली व तरुण पिढीला पुढील वाटचालीसाठी चांगले मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, व तरुण वर्गासोबत स्वतः जमिनीवर बसून ग्रामस्थांन सोबत चर्चा केली. ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले.






0 टिप्पण्या