रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पाटिल यांना उपजिल्हाधिकारी यांची दमदाटी- कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ४ - रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे महसूल सहाय्यक तथा अध्यक्ष, भूषण पाटील यांना रायगड चे उपजिल्हाधिकारी नितिन राऊत यांनी केलेल्या शिवीगाळ व मारण्यास धावून गेल्याच्या निषेधार्थ दि. ४ ऑगस्ट २०२३ पासून रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी वर्गाने कामबंद आंदोलन घोषित केले आहे. जोपर्यंत उपजिल्हाधिकारी नितिन राऊत हे भूषण पाटील यांची जाहीररीत्या माफी मागत नाहीत तोपर्यत संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
संपूर्ण जिल्हात असा पवित्रा महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. महसूल कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली असुन प्रशासाने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रशासन ह्या गंभीर घटनेची व नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन काय निर्णय घेणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बद्दल सर्व कर्मचारी नी तालुका स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.




0 टिप्पण्या