आर पी आय (A) कडून २५० विद्यार्थ्यांना जेवण वाटप
पोलीस प्रवाह न्यूज
खटाव-दि. २- महान समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या वतीने खटाव तालुक्यातील जि .प. शाळा क्र. १ आणि २ येथे २५० विद्यार्थ्यांना दि. १ ऑगस्ट रोजी जेवण वाटप करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यमासाठी खटाव तालुका शिक्षण विस्तार अधिरी संगीता गायकवाड, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, जेष्ठ पत्रकार धनंजय क्षीरसागर, समजसेवक सोमनाथ साठे, रिपाई (A) चे खटाव तालुका उपाध्यक्ष विनोद जाधव, खटाव तालुका गटनेते अतुल घोणे, रायगड जिल्हा गटनेते जयदास मालोरे, तालुका युवक अध्यक्ष रोहित मोरे, तालुका सल्लागार विजय यादव, महिला आघाडी खटाव तालुका अध्यक्षा उषाताई जाधव, सुमन जाधव, शैला जाधव, संयोगिता जाधव, वैभवी जाधव, निलेश जाधव, सूरज जाधव, प्रशांत भोंडवे, विश्वजित शिंदे, प्रशांत राऊत आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे म्हणाले की, माझ्याकडून आपल्या शाळेला नेहमीच मदत राहील यात तिळमात्र शंका बाळगू नये. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले तर शिवाजी खाडे सर यांनी आभारप्रदर्शन केले.




0 टिप्पण्या