गोरेगांव आरोग्य केंद्र येथे कुणबी युवा मंच मुंबई यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न
गोरेगाव-दि.- २१- आरोग्य केंद्र गोरेगांव या ठिकाणी कुणबी युवा मंच मुंबई आणि माय भूमी फाउंडेशन रायगड रत्नागिरी सलग्न वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुणबी समाज बत्तीशी विभाग लोणेरे गोरेगांवचे अध्यक्ष प्रकाश टेंबे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले.
यावेळी डॉ विनोद गोरेगावकर, डॉ. डॉ संदेश तेटगुरे, सचिन धुमाळ, रामभाऊ टेंबे, वामन बैकर सरपंच नागाव, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावळे, पांडुरंग सानप, घोडके, पालकर सर, सुधाकर करकरे, भात्रे सर, संजय पाटोळे, मुकेश भोस्तेकर, परेश अंधेरे,चंद्रकांत भोजने, राम भोस्तेकर, प्रभाकर ढेपे, संतोष ढेपे, ज्ञानेश्वर खराडे, सत्यजित भोनकर, सुनिल माठल, राकेश भोस्तेकर रेपोली तसेच कुणबी युवा मंचाचे मुंबईचे सगळे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या यांच्याशुभहस्ते दीपप्रज्वलन करुन मंचाच्या वतीने उपस्थित कुणबी समाजातील मान्यवरांचे यथोचित सन्मान करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमानिमित्ताने महाड, पोलादपूर, माणगाव आमदार भरत गोगावले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कुणबी युवा मंचाचे काम उत्तम असून असेच अवितर चालत राहो. त्यांनी लोणेरे, गोरेगांव या साठी सुसज्ज अशी ॲम्बुलन्स उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चालके, उप तालुका प्रमुख मधुकर नाडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, विभाग प्रमुख रवींद्र टेंबे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबीरा मध्ये वाताचे विकार, स्त्रीयांचे आजार, मायग्रेन (डोकेदुखी), संधीवात, आमवात, मनक्याचे आजार, पोटाचे आजार, पित्ताचे आजार, मधूमेह, अशा अनेक आजार वर या शिबीरात उपचार करण्यात आले. या शिबीराचा हजारो लोणेरे गोरेगांव परिसरातील नागरिकांनी घेतला. हा कार्यक्रम आयोजित करुन यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष ज्ञानेश्वर खराडे, सत्यजित भोनकर, सुनील माठल टिमने प्रयत्न केले. तसेच या कार्यक्रमास आरोग्य केंद्र गोरेगांव यांचे विषेश सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व अभार सत्यजित भोनकर यांनी केले.





0 टिप्पण्या