पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीला पर्यावरण संवर्धन उपक्रमांबद्दल सुवर्ण पुरस्कार प्राप्त
लखनौ (उत्तर प्रदेश) येथे १४ वा ‘एक्सीड ग्रीन फ्युचर अवॉर्ड’ सोहळा संपन्न
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २६- सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशन (एक काम देश के नामचे एक युनिट) "बीट द प्लास्टिक पोल्युशन" या विषयावरील परिषदेसह या पुरस्कारांचे आयोजन केले होते. या परिषदेला "पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार" यांचे अनुमोदन होते. पुरस्काराच्या निवडीचे निकष व प्रक्रिया हि खूप कठीण होती. नियुक्त केलेल्या परीक्षकांनी पुरस्काराच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. निवडीच्या प्रक्रियेमध्ये एकूण नऊ निकष होते आणि त्यापैकी भारतभरातील नामांकनांमधून पर्यावरण संरक्षण अंतर्गत स्टील विभागातील नामांकनात पोस्को महाराष्ट्र स्टीलने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सुवर्ण पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्कारासाठी पूर्ण भारतभरातून नामांकने प्राप्त झाली होती. या पुरस्कारांच्या पडताळणीचे एकूण तीन टप्पे होते. यासाठी ४-५ महिने इतका कालावधी लागला. पोस्को महाराष्ट्राने राबवलेले उपक्रम आणि पद्धती तपासल्यानंतर शेवटी निर्णायकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.
पोस्कोच्या संबंधित विभागासाठी आणि सामाजिक उपक्रमांतर्गत धोरणात्मात आणि रचनात्मक केलेल्या कामांसाठी हा एक अभिमानाचा क्षण होता. अशी मान्यता मिळवून कंपनी संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या धर्तीवर नियोजन करून “एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक” या दिशेने अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी आणि सुधारणा करण्यास उत्सुक आहे.
अदानी, जेएसडब्लू, एल अँड टी, मारुती सुझुकी, गेल, होंडा, हिंदुस्थान युनिलिवर, टाटा पॉवर, जॉन डीअर, भेल, अशा सुमारे १२० हून अधिक प्रसिद्ध कंपन्या या पुरस्कारांचा यादीत आहेत. पोस्को महाराष्ट्र कंपनी हा प्रतिष्ठित पुरस्कार नम्रपणे स्वीकारत आहे आणि २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रल या महत्त्वाकांक्षी ध्येयावर लक्ष्य केंद्रित करून पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने सर्वोत्तम काम करत राहील, असे मत कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बोलताना पोस्को कंपनीचे भारताचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. दे अप किम म्हणाले की, आम्ही व्यवसाय नैतिकतेच्या मार्गांनी व सर्व जागतिक मानकांचे पालन करून करतो आणि आम्ही भारतात पर्यावरण पूरक स्टील उत्पादन बनवण्याच्या पद्धती सुरू ठेवू आणि त्यामध्ये सातत्य राखू.


0 टिप्पण्या