माणगाव तालुक्यातील खरवली विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार हादरा
चेरवलीचे संतोष खडतर समर्थकांसह शिंदे गटात दाखल
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.- २०- माणगाव तालुक्यातील चेरवली गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष खडतर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करून महाड, पोलादपूर, माणगाव आ. भरत गोगावले यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन माणगाव शासकीय विश्राम गृह येथे रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी आ. भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे माणगांव तालुक्यातील खरवली विभाग राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार हादरा बसला आहे.
संतोष खडतर हे माणगाव तालुक्यातील सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मोठे नाव असून ते या क्षेत्रात झोकून देऊन काम करीत असतात. तालुक्यातील तरुण वर्गाचे ते आशास्थान आहेत. साई पालखी संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे असे संतोष खडतर व्यक्तिमत्व आहे. आपल्या विभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागावीत व आगामी येणाऱ्या तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यांनी माणगाव येथे रविवारी आ. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी संतोष खडतर यांच्यासमवेत राजाराम खडतर, लक्ष्मण खडतर, पांडुरंग खडतर, योगेश खडतर, शैलेश खडतर, राहुल खडतर, सुनील खडतर, प्रवीण खडतर, प्रदीप खडतर, बाळाराम जाधव, सिद्देश जाधव, सुमित खडतर आदींसह एकूण ३० कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे तालुकाप्रमुख अँड. महेंद्र मानकर, श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक अँड. सुशील दसवते यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना आ. भरत गोगावले म्हणाले कि, सर्वप्रथम मी संतोष खडतर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना शिंदे गटात अभिनंदन करतो. साई सेवा पालखी संस्थानतर्फे संतोष खडतर हे चांगले काम करीत आहेत. त्यांनी श्रावण सारख्या शुभ महिन्यात योग्य वेळी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. खरवली विभागातील जी-जी विकासकामे आपण सुचवाल ती पूर्ण केली जातील असे ते म्हणाले. प्रवेशकर्ते संतोष खडतर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, आ. भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी मधून आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, शिवसेना शिंदे गटाचे नेते अँड. राजीव साबळे, शिंदे गट युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगाव तालुकाप्रमुख अँड. महेंद्र मानकर, शिंदे गट युवासेना जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, योगेश बक्कम, संतोष खडतर यांचे मित्र परिवार अँड. सुशील दसवते, उदय डाल, महेश शिर्के, अजित भोनकर, समाधान उतेकर, राजेंद्र नवगणे , पप्या शिर्के, संतोष मुंढे, सुजित सकपाळ यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या