सेवापूर्ती समारंभात जेष्ठ पत्रकार अरूणदादा पोवार गहिवरले

 सेवापूर्ती समारंभात जेष्ठ पत्रकार अरूणदादा पोवार गहिवरले


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १-  तालुक्यातील जेष्ठ पत्रकार अरुणदादा पोवार यांचा माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकदादा साबळे माणगांव ज्युनियर कॉलेजच्या प्रयोग शाळा सहाय्यक सेवेचा सेवापूर्ती समारंभ दि. ३१ जुलै रोजी अशोकदादा साबळे महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी सत्कारमूर्ती अरुण पोवार आपले मनोगत व्यक्त करताना गहिवरले.
कवी, लेखक, पत्रकार, लोकनेते अशोकदादा साबळे पतसंस्थाचे चेअरमन, सामजिक कार्यकर्ता, माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे संस्थापक, राजकीय नेतृत्व आणि शिक्षण सेवेतील एक सेवक असे चतुरसूत्री व्यक्तीमत्व असणाऱ्या रायगड भूषण अरुण दादांच्या सेवापूर्ती समारंभासाठी माणगांव तालुक्यातील विविध दिग्दजानी उपस्थिती लावली होती.

 यामध्ये माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, स्कुल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड, सदस्य नितिन बामुगडे, सदस्य ऍड विनोद घायाळ, सदस्य  डॉ.आबासाहेब पाटणकर सर्व सदस्य  अशोकदादा साबळे विद्यालय, ज्युनियर कॉलेज, द. ग. तटकरे महाविद्यालय, अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय, एस एन स इंग्लिश मिडीयम स्कुलचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग, दादांचे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच गुरुमाऊली ग्रुपचे सदस्य तसेच अरूणदादा पोवार यांना मानणारा मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.

अरुण दादानी केलेल्या सामाजिक कार्या प्रति माणगांव शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक, निवृत्त शिक्षक, सहकारी कर्मचारी यांनी प्रत्येकाने अरूण दादांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र १० मिनिटे मी बोलणार असे  बोलणारे सेवापूर्ती समारंभाचे सेवापुष्प अरुण दादा एक हरहुन्नरी वक्ता असताना देखील २ मिनिटातच गहिवरले....! त्यांनर माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड राजीव साबळे अरूण दादाच्या मैत्रीतील अनेक आठवणीना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक दिलीप उभारे यांनी तर आभार प्रदर्शन भानुदास  बिरादार यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या