पुणे विमाननगर एस आर ए बिल्डिंग येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 पुणे विमाननगर एस आर ए बिल्डिंग येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पोलीस प्रवाह न्यूज

पुणे-दि. १६- पुणे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदैव जनतेचे रक्षण करणारे २४ तास ऑन ड्युटी असणारे महाराष्ट्र पोलीस यांचे वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलिस उपनिरीक्षक संदिप कर्पे, महिला पोलिस उपनिरीक्षक समु चौधरी,  पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे, पोलीस अंमलदार रवींद्र सोडेकर, पोलीस अंमलदार आर्य शंकर वाघोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच शांततेचे प्रतिक म्हणून पांढरा शुभ्र रंगाचे कबूतर पोलीस हवालदार ग्रहरक्षक दल राम लहाडे, पोलीस शिपाई ग्रहरक्षक रफिक शेख  यांच्या हस्ते आकाशात सोडून करण्यात आले. उर्मी संस्था अनिता कापरे, अभिनेता आनंद भाऊ खुडे, अभिनेत्री ज्योती डोळस, दिग्दर्शक तीर्थ भाऊ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. उर्मी संस्था संस्थापक राहुल शेंडे , रेश्मा शेंडे, अजय भाऊ आढागळे, बाबाभाऊ सरवदे, सचिन भाऊ डेंगळे, बाबा भाई शेख, राहुल भाऊ क्षीरसागर, आबा भाऊ केंदळे, हर्षदा जाधव, राकेश भाऊ वैराट, राहुल भाऊ क्षीरसागर, आणि श्याम भाऊ नागवी साऊंड ऑपरेटर यांचे विशेष सहकार्य लाभले. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांचे विविध खेळ ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या. तसेच क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांच्या खेळांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यास दप्तर व पूर्ण शालेय साहित्य देण्यात आले. तसेच क्रिकेटमध्ये विजेता संघास १०११ चे पारितोषिक व द्वितीय विजेता संघास ५०१ चे पारितोषिक देण्यात आले.  उपस्थित सर्वच लहान मुलांना कंपास पेटी,  शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन उपाध्यक्षा महिला आघाडी छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदारसंघ भाजपा पुणे कु.मंजू ताई वाघमारे यांनी केले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या