आर पी आय (A) खटाव तालुक्याकडून वडूज पंचायत समितीमध्ये बहुउद्देशिय कार्यक्रम.

 आर पी आय (A) खटाव तालुक्याकडून वडूज पंचायत समितीमध्ये बहुउद्देशिय  कार्यक्रम.

७६ व्या स्वातंत्र्यदिनी आर पी आय (A) खटाव कडून वडूज पंचायत समितीमध्ये विविध कार्यक्रम.

पोलीस प्रवाह न्यूज

सातारा-दि.१६-  यावर्षी भारतीय ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात आझादी की का अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. "हर घर तिरंगा" उपक्रम  देखील राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे तालुके आणि शहरे बाजारपेठा दुष्काळग्रस्त आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा देखील समावेश होतो. या ठिकाणी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या वतीने वडूज पंचायत समिती येथे दि. १५ ऑगस्ट निमित्त घेण्यात आलेला  बहुउद्देशीय सामजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि २ यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्यातर्फे एक  के सिटी २५/ ५० या मॉडेलचा पियानो लहान मुलांना नृत्य शिकण्यासाठी देण्यात आला. त्याचबरोबर ७६व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांना २० किलो जिलेबी देण्यात आली. त्यावेळी खटाव तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी  सर्जेराव पाटील, खटाव तालुका शिक्षण विकास अधिकारी  प्रतिभा भराडे, धकाम अभियंता खलीपे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी झेंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी पाटोळे मॅडम, माने मॅडम, लघुपाटबंधारे विभाग अधिकारी अमोल वाघमारे, माजी सभापती संदीप मांडवे, खटाव तालुका येरळा ग्राफिकचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार धनंजय क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका गटनेते अतुल घोणे, रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा गटनेते जयदास मालोरे, तालुका सल्लागार विजय यादव, ठाणे महिला आघाडी अध्यक्ष कोमल बागल, युवानेते सागर बागल, रोहित भिलारे, अमोल पोळ, प्रशांत भोंडवे, रोहित मोरे, विनोद जाधव, सुरज जाधव, विश्वजीत शिंदे, चिकूशेठ जाधव सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले, खटाव तालुका शिक्षण विकास अधिकारी  प्रतिभा भराडे यांनी सर्व मान्यवरांचे  आभार मानले. तसेच रिपब्लिकन पक्ष खटाव तालुका हा नेहमीच गोरगरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थी यांना मदत करण्यास तत्पर असतो. यात तीळमात्र शंका नाही. तसेच वडूज येतील हुतात्मा परशुराम विद्यालय महात्मा फुले शाळा नूतन शाळा सर्व अंगणवाड्या यांना ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण ८५ किलो जिलेबी वाटण्यात आली. खटाव तालुका गटविकास अधिकारी यांनी खटाव तालुका आर पी आय तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांचा जाहीर सत्कार केला. व रिपब्लिकन पक्षाचे रायगड मुंबई उस्मानाबाद सातारा येथून आलेले पदाधिकारी यांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या