विभाजन विभीषीका स्मृती दिवस निमित्त माणगावमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून मूक मोर्चा
माणगांव-दि.- १५- भारताची फाळणी ही अभूतपूर्व मानवी विस्थापन आणि सक्तीच्या स्थलांतराची वेदनादायक घटना आहे.राष्ट्राच्या इतिहासातील ही अशी दुर्दैवी घटना आहे, ज्यामध्ये लाखो लोकं अनोळखी भागात, अनोळखी लोकांमध्ये नवीन घर शोधत होते.श्रद्धा आणि धर्मावर आधारित हिंसक फाळणीची घटना असण्याबरोबरच जीवनशैली आणि अनेक वर्षांच्या सहजीवनाचा अचानक आणि नाट्यमय अंत कसा झाला याचीही ही घटना आहे.सुमारे साठ लाख बिगर मुस्लिमांनी या प्रदेशातून स्थलांतर केले जे नंतर पश्चिम पाकिस्तान बनले. पंजाब, दिल्ली इत्यादी भारतीय भागांमधून ६५ लाख मुस्लिम पश्चिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले. २० लाख गैर-मुस्लिम पूर्व बंगालमधून, जे नंतर पूर्व पाकिस्तान बनले,पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले. १९५० मध्ये पश्चिम बंगालमध्ये आणखी २० लाख गैर-मुस्लिम आले. पश्चिम बंगालमधून १० लाख मुस्लिम पूर्व पाकिस्तानात स्थलांतरित झाले.
विभिषिकेत दंगली उफाळून आल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र हा आकडा दहा लाखांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे,हजारो महिलांवर क्रूरपणे अत्याचार झाले,आणि ह्या आपल्या दुर्दैवी बांधवांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सामील होण्याकरिता आवाहन करण्यात आले होते दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०४.०० वा. माणगाव येथील बालाजी मंदिर ते शहीद घाडगे स्मारकापर्यंत बाजारपेठ मार्गे मूक मोर्चा पार पडला. यामध्ये भा.ज.पा. माणगाव तालुका, पदाधिकारी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, माणगांव तालुका अध्यक्ष उमेश साटम, सरचिटणीस गोविंद कासार, युवराज मुंढे, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेविका ममता थोरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने, शहराध्यक्ष नितीन दसवते, महिला मोर्चा शहराध्यक्ष भारती शेठ, माजी समनव्य समिती अध्यक्ष भालचंद्र (नाना)महाले, अशोक यादव, राजेंद्र म्हामूणकर, तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राजक्ता शुक्ल ,दिप्ती नकाशे, अश्विनी खरे, अश्विनी यादव, परेश सांगले, भा.ज.पा. माणगाव तालुका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रसेविका समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मावळा प्रतिष्ठान माणगाव त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध स्तरातील संघटना व राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
हा मुकमोर्चा कचेरी रोडवर वीर घाडगे स्मारकाजवळ आल्यानंतर वीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदरील मोर्चा हा मूक स्वरूपात असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या नाहीत. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वज सोबत आणला होता.त्याचप्रमाणे शहीद घाडगे स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर फाळणी विषयावर निमंत्रित असणारे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष ऍड अनिकेत ठाकूर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.या सर्व मोर्चाच्या नियोजनात आणि व्यवस्थपनात भाजप युवानेते निलेश थोरे आणि मित्रमंडळी यांनी महत्वाची भूमिका बजावली.फाळणी मध्ये मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पित करून सभा विसर्जित करण्यात आली.




0 टिप्पण्या