सिध्दनेर्ली येथे मुक्ती पर्व दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण.

 सिध्दनेर्ली येथे मुक्ती पर्व दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण.

पोलीस प्रवाह न्यूज

सिध्दनेर्ली : दि. १३ -  संत निरंकारी मंडळ,दिल्ली यांच्या वतीने रविवारी १३ऑगस्ट रोजी मुक्तीपर्व दिन साजरा करण्यात आला.या उपक्रमात संत निरंकारी मंडळ सिध्दनेर्ली शाखेच्या सतसंग भवनाच्या परीसरात शाखा प्रमुख श्री.शिवाजी डोंगळे,निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष श्री.मधुकर येवलुजे,सेवादल शाखा शिक्षक श्री.कौतुक बंके,सेवादल शिक्षीका अर्चना लोहार यांच्या शुभहस्ते पारिजात,सोन चाफा,पुडीका चाफा,रातराणी अशा विविध प्रकारच्या फुल झाडांच्या  वृक्षांचे रोपण करून मुक्तीपर्व दिन साजरा करण्यात आला.

यावेळी तुकाराम निकम,संभाजी निकम,रामदास हजारे,सिध्दू हजारे,कृष्णात बन्ने, प्रदीप मगदूम, पराग डोंगळे,दादासो घराळ,धनश्री घराळ,दिशा तांदळवाडे,अनिता बंके,मनोज पाटील,दिलीप पाटील यांच्या सह संत निरंकारी मंडळाचे सेवादल महात्मा व सेवादल भगिनी यांच्या उपस्थितीत हा मुक्तीपर्व दिन साजरा करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या