दहिवली कोंड उपसरपंच संदिप पालकर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातच.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. ३१ - सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणता नेता किंवा कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे. हे जनतेला कळणे फारच कठीण होत आहे. एखाद्या वेळेस काही कामासाठी आमदार यांना भेटून काही विकास कामांची चर्चा जरी केली तरी या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या गटात प्रवेश केला त्या गटात प्रवेश केला अशी अनाधुंधी चर्चेला उधाण येत असत. असाच एक प्रकार माणगाव तालुक्यात देखील घडला आहे.
दहीवली कोडंचे उपसरपंच संदीप बारकु पालकर हे उद्गव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटातून महविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी बाळाराम पालकर यांच्या सोबत आ. भरत गोगावले यांच्याकडे विकास कामांसाठी व चर्चेला गेले होते. मात्र काही वृत्तपत्रात तसेच स्थानिक वाहिन्यांवर संदीप पालकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटता प्रवेश केला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र दहिवली कोडंचे उपसरपंच संदीप पालकर यांनी आपण कुठल्याही पक्षात प्रवेश केला नसून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेतून निवडून आलो आहे. आणि मी तिथेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडी सोबत असून कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही.



0 टिप्पण्या