बांधकाम कामगारांच्या मंजुर लाभाची रक्कम कामगारांच्या खात्यावर लवकरच जमा करणार....... मुख्य वित्त व लेखाधिकारी मान. धनाजीराव शिंदे
पोलीस प्रवाह न्यूज
मुंबई : बांधकाम कामगारांना लाभाचे, अर्ज मंजुरीचे मेसेज येऊन सुद्धा बहुतांशी कामगारांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा होत नव्हती,ती लाभाची रक्कम जमा करण्याचे काम सुरूच आहे, परंतु ज्यांची रक्कम जमा झाली नाही ती रक्कम तात्काळ कामगारांच्या खात्यावर जमा केली जाईल असे अश्वासन महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य वित्त व लेखाधिकारी मान. धनाजीराव शिंदे यांनी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत, कामगारांच्या शिष्यवृत्तीची रक्कम, घरकुल योजनेची रक्कम तसेच विविध योजनांच्या मंजुर लाभाची रक्कम, जिल्हा कार्यालयाकडुन कळविल्यानंतर तात्काळ जमा करण्याचेआश्वासनही मंडळाचे मुख्य वित्त व लेखाधिकारी धनाजीराव शिंदे यांनी दिले.
मंडळाला दिलेल्या निवेदनामध्ये ,बि फार्म मेडीकल डिग्रीचा १ लाख रुपये लाभ मिळावा,घरकुल योजनेचे अर्ज मंजुर होऊनही त्यांचे अनुदान अध्याप खात्यावर वर्ग झाले नाही ते तात्काळ करावे. व कार्यालयाकडे दाखल झालेले घरकुल योजनेचे अर्ज तातडीने मंजुर करावेत,कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण, व लाभाच्या अर्जाची तृटी आल्यास, ७ दिवसात तृटी अपडेट न केल्यास अर्ज रिजेक्ट होतो सदर अट तात्काळ रद्द करावी, घरकुल योजनेमध्ये कामगाराच्या वडीलांच्या नावावर किंवा महीला कामगारांच्या सासऱ्याच्या नावावर जागा असल्यास समंती पत्रावर घरकुल मंजूर करावे,आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून रिपोर्ट न देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करा. व त्याबदल्यात बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा,१८ ते ६० वयोगटातील कामगारांना नैसर्गिक मृत्यू लाभ दोन लाख रुपये व अपघाती मृत्यू लाभ पाच लाख रुपये द्यावे, १ जुन २०२१ रोजी साधारण ४३०० हुन अधिक, १५०० रूपयाची कोविड अनुदान मिळण्यासाठी पात्र कामगारांची यादी मंडळाकडे पाठवुन सुद्धा मंडळाने अध्याप त्या कामगारांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली नाही ती ताबडतोब करावी, ज्या कामगारांची मुले एम फील, पी एच डी व तत्सम शिक्षण घेत असतील त्याना एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे,विविध योजनांचे अर्ज दाखल केल्यानंतर ११ दिवसात कामगाराच्या खात्यावर रक्कम जमा करावी. व सर्व योजनांच्या रकमेत दुप्पट वाढ करा,ग्रेस पिरेड मधील कामगारांना नैसर्गिक, अपघाती मृत्यू लाभ,देण्यात यावेत, मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीना २ हजार रुपये द्या,नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे अर्ज दाखल झाले नतंर आठ दिवसात चेक करा,ऑनलाईनमध्ये जी कागदपत्रे अपलोड करावी लागतात, त्याव्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे मागु नयेत,या वअन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामधील बहुतांशी मागन्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ भरमा कांबळे, कॉ शिवाजी मगदूम, कॉ प्रकाश कुंभार, कॉ संदीप सुतार, कॉ नुरमहमद बेळकुडे, कॉ अरंजय पाटील, कॉ भगवानराव घोरपडे उपस्थित होते.



0 टिप्पण्या