स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त सिद्धनेर्लीत मूत्ररोग शिबिर संपन्न

 स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त  सिद्धनेर्लीत मूत्ररोग शिबिर संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

सिद्धनेर्ली-दि. १९- दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करा व आरोग्याची काळजी घ्या.  मुत्राशयांच्या आजाराकडे दुर्लक्ष करून आजार अंगावर काढल्यास त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच तपासण्या करून आरोग्यविषयक काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  मूत्ररोग तज्ञ  डॉ. व्ही. एन. मगदूम यांनी केले. ते सिद्धनेर्ली ता. कागल येथे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त या मूत्ररोग शिबिरा प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना डॉ मगदूम म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय एस के मगदूम यांनी गावांमध्ये विविध संस्था स्थापन करून लोकांची आर्थिक प्रगती साधण्याचा व गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. 

स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुनील मगदूम यांनी केले. आभार रमेश कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच एम बी पाटील, एन के मगदूम, आनंदा घराळ, बळीराम मगदूम, विलास पोवार ,बापू पाटील , बा.ना. घराळ , सोपान घराळ, युवराज पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्व. एस. के. मगदूम(सर) सहकार समूह व मगदूम एन्डो-सर्जरी इन्स्टिट्यूट, कोल्हापूर यांच्या वतीने  मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात किडनी स्टोन (मुतखडा), प्रोस्टेट, लघवीचे विकार, किडनी खराब होणे, अपेंडिक्स व पोटाचे सर्व विकार तसेच रक्त व लघवीची मोफत तपासणी केली. या शिबिराचा जवळजवळ १०० लोकांनी लाभ घेतला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या