खांदाडच्या नवयुवक मित्रमंडळाच्या युवकांनी वाचविले वृद्ध वंदना जोशी यांचे प्राण.

 खांदाडच्या नवयुवक मित्रमंडळाच्या युवकांनी वाचविले वृद्ध वंदना जोशी यांचे प्राण

माणगांव पोलिसांतर्फे करण्यात आला युवकांचा सत्कार

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ५ - माणगाव शहरातील खांदाड वृद्ध आजी ह्या माणगांव काळ नदीच्या गणपती विसर्जन  घाटावर दि. ५ जुलै रोजी कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा अचानक तोल गेल्याने त्या काळ नदी प्रवाहात सामील झाल्या. मात्र त्यांनी जीव वाचविण्यासाठीचे अतोनात प्रयत्न सुरू ठेवले. पाण्यावर हात पाय मारून देखील त्या वृद्धत्वामुळे काळ नदीत चालल्या होत्या. मात्र माणगाव शहरातील दक्ष असणाऱ्या खांदाड मधील नवयुवक मित्र  मंडळाच्या सदस्यांनी जिवाची बाजी लावून वंदना जोशी यांचे प्राण वाचविले आहेत.

    काळ नदीमध्ये धाव घेऊन वृद्ध आजी वंदना जोशी यांचे प्राण वाचविण्यासाठी नवयुवक मित्रमंडळ खांदाड मधील महेश उर्फ़ बाळा पोवार, नहूश जाधव, दिपक जाधव, शुभम शिंदे, बाळ्या जाधव, महेश महादेव पोवार या युवकांनी पुढाकार घेतला. त्यांतनर माणगाव तालुक्यातील सामजिक कार्यात आणि समाजसेवेत सदैव तत्पर असलेले खांदाड गावचे दक्ष पोलीस पाटील नथुराम वेटू पोवार यांनी दक्ष भूमिका घेत वंदना जोशी यांना माणगाव उपजिल्हारुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले. यावेळी घटनास्थळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार,  पो. नि. राजेंद्र पाटील, पो. शि. राम डोईफोडे, संदिप सानप उपस्थित होते. 

प्राणाची बाजी लावणाऱ्या या खांदाड युवकांचा माणगाव पोलीस ठाण्याकडून पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, स. पो. नि. सतिश अस्वार, पो. शि. राम डोईफोडे, श्रीनिवास साबळे,  रावसाहेब कोळेकर, मयूर पाटील उपस्थित होते. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या