मुंबई गोवा महामार्गावर निळज गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स आणि ट्रक मध्ये भीषण अपघात

 मुंबई गोवा महामार्गावर निळज गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स आणि ट्रक मध्ये भीषण अपघात


दोन्ही वाहनातील १३ जखमी तर ट्रक चालक गंभीर जखमी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ४- मुंबई गोवा महामार्गावर एकीकडे महामार्गाचे काम सुरु  आहे. तर कामाच्या काही ठिकाणी कंत्राटदार कंपनीकडुन योग्य ठिकाणी दिशादर्शक बसविले नसल्याने अपघाताची मालिका सतत सुरू आहे. अशाच प्रकारे दि. ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नाणीज येथुन प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स क्रं एम एच ४३ बी जी ६५९१ व ट्रक क्र एम एच ०५ ए एम  ०५९१ यामध्ये माणगाव तालुक्यातील निळज गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्ग क्रं. ६६ वर हा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील  ११ प्रवासी, चालक व ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत.  या अपघातात दोन चालक व ११ प्रवासी अशी जखमीची संख्या एकूण १३ अशी आहे. यामधील ट्रक चालक व ट्रॅव्हल्स बसमधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना नवी मुंबई येथील एम. जी. एम. रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


या अपघाताबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, या घटनेतील फिर्यादी शैलेंद्र सकपाळ रा. अंबरनाथ ठाणे हा आपल्या ताब्यातील बस मुंबई बाजूकडे घेऊन जात असताना अज्ञात ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना मुंबई बाजूकडुन गोवा बाजूकडे येणाऱ्या घटनेतील आरोपी अनिल भानुदास जाधव रा. तूळजापूर, उस्मानाबाद याने आपल्या ताब्यातील ट्रक हा अतिवेगाने, हयगयीने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून राँग साईड ला येऊन घटनेतील फिर्यादी यांच्या ट्रॅव्हल्स बसला उजव्या बाजूला ठोकर मारल्याने बस डाव्या बाजुला रोडच्या खाली जाऊन हा अपघात घडला आहे.

 अपघातातील जखमींची नावे- 

१)अनिल भानुदास जाधव.रा .तुळजापूर (ट्रक चालक).

२)शैलेंद्र राजेंद्र सकपाळ. रा.अंबरनाथ (बस चालक).

३)मंगला प्रकाश वरूडकर .रा नवी मुंबई.

४)पांडुरंग लक्ष्मण पार्टे रा.मुंबई.

५)तुकाराम मारुती चव्हाण रा. नेरुळ.

६)प्रकाश भाऊराव वरूडकर रा.वाशी.

७)गणपत दाजी खेतले.रा कळवा.

८)संतोष राजू साळवे रा.नवी मुंबई.

९)प्रकाश गोपाळ दाजलेकर.रा. नवी मुंबई.

१०)प्रमोद प्रकाश शर्मा.रा. मुंबई.

११)सुरेश भास्कर वाघ.रा.नवी मुंबई.

१२)दत्ताराम जगदेव शिर्के रा. नवी मुंबई.

१३)सोनाली संजय शेडगे रा. नवी मुंबई.

अशी आहेत सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांची परिस्थिती पाहता अपघाताची परिस्थिती खूप भयानक होती. यातील किरकोळ जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं २२३/२०२३ भ. दं. वि. स. कलम २७९, ३३७, ३३८, मो. वा. का. कलम १८४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सतिश आस्वर हे करीत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या