दहावी बारावीनंतर ही आपण शासकीय अधिकारी होऊ शकता - सत्यवान रेडकर.

 दहावी बारावीनंतर ही आपण शासकीय अधिकारी होऊ शकता - सत्यवान रेडकर.

पोलीस प्रवाह न्यूज 

    महाराष्ट्र राज्य पोलीस प्रवाह न्यूज  व समाज विकास केंद्र संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका सिद्धनेर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 29 जून ते 1 जुलै पर्यंत  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

  या कार्यक्रमासाठी वित्त मंत्रालय ,राजस्व विभाग ,भारत सरकार या ठिकाणी कार्यरत अनुवाद अधिकारी श्री सत्यवान रेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधून एमपीएससी यूपीएससी तसेच इयत्ता दहावी नंतर उपलब्ध असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अगदी ओघवत्या भाषेमध्ये करून दिली एक नापास विद्यार्थी ते यशस्वी अधिकारी हा प्रवास त्यांनी सहजपणे सर्व विद्यार्थ्यांपुढे मांडला.

 विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपली क्रमिक पुस्तके वाचून त्याचा अभ्यास चांगला करावा. दहावी बारावीनंतरही केंद्रीय स्तरावर अनेक परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये आपण आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. यासाठी आपले कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.रेडकर यांनी सामान्य विज्ञान, जनरल नॉलेज, गणित,इंग्रजी व्याकरण इत्यादी विषयात कोणतेही इतर क्लासेस न लावता  स्पर्धा परीक्षा अभ्यास कसा करावा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

 सदर व्याख्यान शिबीर सिद्धनेर्ली विद्यालय व जुनिअर कॉलेज सिद्धनेर्ली, डी.आर.माने महाविद्यालय कागल, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर,व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी हुपरी या ठिकाणी संपन्न झाले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या