कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस संघाची उल्लेखनीय कामगीरी.

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस संघाची उल्लेखनीय कामगीरी.

पोलीस प्रवाह न्यूज 

कोल्हापूर : दि.२९ - कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2023 हा दिनांक 19/07/2023 ते 21/07/2023 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथे पार पडला असून सोलापूर ग्रामीण संघाने 3 सुवर्ण, 3 रौप्य व 6 कांष्य पदके मिळवून कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये सोलापूर ग्रामीण संघाणे घवघवीत यष मिळविले आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलीस संघाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी केले असून सपोनि दिलीप ढेरे बार्षी षहर यांनी ‘फॉरेन्सीक सायन्स’, ष्वान टेरी व हस्तक पोहेकॉ सिध्दलिंग स्वामी ष्वान पथक यांनी ‘एक्सप्लोसिव्ह सर्च’ व मपोकॉ क्रांती पवार पोलीस मुख्यालय यांनी ‘पोलीस ऑब्जर्वेषन’ या स्पर्धा प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, पोहेकॉ जयवंत सादुल अंगुली मुद्रा विभाग यांनी ‘पोलीस फोटोग्राफी’, ष्वान डॉली व हस्तक पोहेकॉ चिंतामनी जंगले ष्वान पथक यांनी ‘ट्राकर’ व ष्वान बॉन्ड व हस्तक पोकॉ तौसिफ षेख ष्वान पथक यांनी ‘नार्कोटीक्स’ या स्पर्धा प्रकारांमध्ये 3 रौप्य, पोसई सुरज निंबाळकर सोलापूर तालुका  यांनी ‘फॉरेन्सीक सायन्स व ऑफिसर फोटोग्राफी’, पोहेकॉ इकबाल षेख सीसीटीएनएस विभाग यांनी ‘व्हीबी.नेट कॉम्प्युटर’, पोकॉ प्रसाद मांढरे वळसंग यांनी ‘व्हीबी.नेट व एमएस ऑफीस कॉम्प्युटर’ व पोकॉ योगेष नरले सायबर यांनी ‘एमएस ऑफीस कॉम्प्युटर’ या स्पर्धा प्रकारांमध्ये 6 कास्य पदके मिळवून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची मान कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये उंचावीली आहे. तसेच सपोफौ भातुंगडे, पोना चौगुले, मेटकरी, तांबोळी, पोकॉ खवतोडे, टोणपे व कांबळे यांनी सदर स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता.
मा.श्री. न्या. षाम चंडक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष पुणे यांचे षुभ हस्ते, मा. श्री. सुनिल फुलारी विषेश पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांचे प्रमुख उपस्थितीत सदरचे कार्यक्रम पोलीस मुख्याल पुणे ग्रामीण व पोलीस संषोधन केंद्र, पुणे येथील सभागृह येथे दिनांक 21/07/2023 रोजी बक्षीस वितरण व सांगता समारोह पार पडला.
सदर कामगीरीबद्दल सोलापूर ग्रामीण जिल्हयाचे षिरिश सरदेषपांडे पोलीस अधिक्षक, हिम्मत जाधव अप्पर पोलीस अधिक्षक, विजया कुर्री पोलीस उपअधिक्षक (मुख्या), सुरेष निंबाळकर पोलीस निरीक्षक स्था.गु. षाखा, आनंद काजुळकर राखीव पोलीस निरीक्षक, पोसई भारत मस्के ष्वान पथक यांनी दिनांक 28/07/2023 रोजी सर्व पदक विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिश्ठ अधिकारी व अंमलदार यांचेकडून षुभेच्छांचा वर्शाव होत असून पदक विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या