सिध्दनेर्ली येथील वैकुंठभूमी सुशोभीकरण उपक्रमाचे लोकार्पण.
पोलीस प्रवाह न्यूज
सिध्दनेर्ली : दि. २८ - सिध्दनेर्ली येथे सह्याद्री देवराई प्रणीत निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात आले आहे.यामध्ये मयत व्यक्तींच्या स्मृती प्रितर्थ वृक्षांना पारकट्टे,बैठकीसाठी सिमेंट बाकडी,संरक्षक भिंत तसेच वृक्षांना क्यूआर कोड बसवून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.सह्याद्री देवराई चे प्रणेते सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की सिध्दनेर्ली करांनी हाती गेलेला हा वृक्षारोपण,वैकुंठभुमी सुशोभीकरण उपक्रमाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा.झाडंच खरा आपला सेलेब्रिटी आहे.झाड आहे तरच आपण आहोत.हा लोकार्पण सोहळा गावचे सरपंच श्री.दत्तात्रय पाटील,श्री.सुहास वायंगणकर,श्री.सचिन चंदने,मधुकर फल्ले,निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे,कृष्णात मेटील,वाय व्ही पाटील,यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
यावेळी निसर्ग व पर्यावरण संघटनेचे सदस्य कॉ.शिवाजी मगदूम,विवेक पोतदार,विजय मोरबाळे,दिपक पाटील,पोपट तवंदे,पवन पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लाईफ इन्शुरन्स कंपनी( LIC)च्या वतीने आदर्श बीमा ग्राम सन २०२२-२३चा पुरस्कार ग्रामपंचायतीस एल आय सी च्या 94Lकोल्हापूर या शाखेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला.
हा धनादेश श्रीयुत संजय पाटील शाखाधिकारी,दिपक कोळी उपशाखाधिकारी,श्री विजय कुंभार विकास अधिकारी,रविंद्र पोवार विमा प्रतिनिधी यांच्या वतीने देण्यात आला.




0 टिप्पण्या