शिक्षिका मानसी पेठे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २९- माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित र. का. गांधी बालवाडी व प्राथमिक विद्यामंदिर गोरेगावच्या मुख्याध्यापिका मानसी मंगेश पेठे प्रदीर्घ सेवेनंतर दि. २८ जुलै रोजी निवृत्त झाल्या आहेत.
शिक्षिका मानसी पेठे या १९९७ रोजी मुख्याध्यपिका या पदावर शाळेत रुजू झाल्या. त्यांनी २६ वर्षाच्या सेवेत अनेक विध्यार्थी घडवले. आज तेच विध्यार्थी मोठमोठ्या शासकीय सेवेत व पदसिद्ध अधिकारी म्हणून आपले नाव कमवीत आहेत. पेठे मॅडम सेवा निवृत्त होत असताना फार भावुक झाल्या होत्या. प्रत्येक शिक्षकांनी आपल्या मनोगतात मॅडमनी केलेल्या कार्याचे गुणगाण व्यक्त केले.
या वेळी त्यांच्या सहकारी शिक्षिका सुद्धा फार भावुक झाल्या होत्या. सहकारी शिक्षिका यांनी त्यांना आठवणींना उजाळा देणारा फोटो अलब म व पेठे मॅडम बद्दल असणाऱ्या भावनाचा पुस्तक त्यांना या वेळी दिले. या सेवापूर्ती कार्यक्रमाला मा. ता. एज्युकेशन सोसायटी चेअरमन श्रीनिवास बेंडखळे, उप उपाध्यक्ष अरुणाताई शेट, सचिव प्रसाद मराठे, खजिनदार विवेक दोशी, सदस्य मंगेश पेठे, प्रसाद मेहता, अरविंद म्हशेळकर, रावल सर, भालेराव मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




0 टिप्पण्या