दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 दिपकभाऊ निकाळजे  यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



पोलीस प्रवाह न्यूज

सातारा-दि. २६-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये दुर्गम आणि दुष्काळी भागातील गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अतिशय दुष्काळग्रस्त तालुका म्हणून खटाव तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वडूज येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या नेतृत्वाखाली गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. व शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी रायगड जिल्हा गटनेते  जयदास मालोरे, खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे, महिला आघाडी खटाव तालुका अध्यक्ष उषाताई जाधव, शैला तालुका गटनेते अतुल जाधव, प्रशांत भोंडवे व राज्यातील आर पी आय (A)पक्षाचे विविध सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या