गोरेगाव विभाग महावितरण अभियंत्याला ७ हजाराची लाच घेताना अटक

 गोरेगाव विभाग महावितरण अभियंत्याला ७ हजाराची लाच घेताना अटक



पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. १९- माणगांव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे यांना दि. १९ जुलै रोजी रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन पकडले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, पाचपोहे यांनीदि.  १८ जुलै रोजी गोरेगाव विभागातील ४९ वर्षीय तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या राहत्या घराच्या जवळ असलेल्या इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करण्याकरीता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्याकरिता ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून दि. १९ जुलै रोजी स्वीकारले. ह्या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक ए सी बी ठाणे परिक्षेत्र सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक ए सी बी ठाणे परिक्षेत्र अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक ए सीबी रायगड शशिकांत पाडावे रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यामध्ये पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाययक फौजदार अरुण करकरे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पो ह महेश पाटील, पो ह कौस्तुभ मगर, पो ह विवेक खंडागळे, पो ना .सचिन आटपाडकर यांनी कर्तव्य बजावले.

या कारवाईनंतर सर्व नागरीकांनी दक्षतेने आवाहन अशा प्रकारे कोणत्याही लोकसेवकानी लाचेची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या