कस्पटे वस्ती वाकड येथील वर्धमान ड्रीम्स सोसायटी मध्ये आषाढी एकादशी जल्लोषात साजरी.
पोलीस प्रवाह न्यूज
दिनांक 29 जून रोजी कस्पटे वस्ती वाकड येथील वर्धमान ड्रीम्स या सोसायटी मध्ये आषाढी एकादशी च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटी मधील बाळ गोपाळांनी विठू माऊली व वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.विठ्ठल नामाच्या जयघोषासह हातात टाळ तसेच पारंपरिक वेशभूषा करून सोसायटी मधील महिलांनी अत्यंत सुंदर असे नृत्य सादर केले.
सपना बढे यांनी नृत्य दिग्दर्शन केले.
नृत्य सादरीकरनामध्ये सपना बढे, शीतल सावंत, सविता पाटील, अमृता कठारे, गीता जगानी, मित्तल जावीया, योगिता ढोमसे, प्रियांका बडजाते, पौर्णिमा चव्हाण, मालती माने, वर्षा गायकवाड, पल्लवी लोणकर, कविता कुतसकर, विद्या चव्हाण, विजया मोरे, नैना केसरी, वैष्णवी बढे, विभूती वारुडे, रुद्रा लोणकर, पल जावीया यांचा समावेश होता.नृत्य सादरीकरणानंतर सर्वांनी हरिपाठाचे पठन केले. कार्यक्रमाला सोसायटी मधील सर्व लहान मुले, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोसायटी चेअरमन अविरत चव्हाण व सर्व कमिटी मेंबर्स तसेच सोसायटी कल्चरल कमिटी ने विशेष परिश्रम घेतले.
सांस्कृतिक,धार्मिक, सामाजिक अथवा कोणताही प्रसंग असो कस्पटे वस्ती परिसरातील वर्धमान ड्रीम्स ही सोसायटी ही नेहमीच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये अग्रेसर असते आणि विशेष म्हणजे सोसायटी च्या कार्यक्रमात जात, धर्म, पंथ, प्रांत या सर्व गोष्टी विसरून सर्व सभासद हे एका परिवारासारखे एकत्र येऊन सहभागी होतात.
आषाढी एकादशी चे महत्व तसेच आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला ज्ञात असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या साठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन एक प्रभावी माध्यम असल्याचे सोसायटी मधील सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस मोटार परिवहन विभागाचे पोलीस अधीक्षक श्री. सचिन बढे यांनी वृत्तपत्राच्या प्रतिनिधिंशी बोलताना सांगितले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ज्यांचा सहभाग लाभला अशा सर्व सभासदांचे आभार मानले.





0 टिप्पण्या