माणगांव तालुक्यातील लोणशी विभागाचा विकास सुभाषशेठ तुमच्यामुळेच झाला आहे- खासदार सुनिल तटकरे.
बापूजी चौंडाई मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. ८ - माणगांव तालुक्यातील लोणशी ग्रामपंचायत हद्दीतील लोणशी गावातील नवसाला पावणारे जागृत देवस्थान श्री बापूजी चौंडाई मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक ७ जून व ८ जून रोजी पार पडला.या कार्यक्रमात रायगड रत्नागिरी चे खासदार सुनिल तटकरे यांनी माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या पाठीवर कौतुकीची थाप देत गौरव केला आहे.साथ आमची जरी असली तरी या विभागातील विकास व्हावा ह्या मागण्या सुभाष केकाणे यांनी तगादा लावून धरल्याने त्या पूर्णत्वास गेल्या आहेत असे मत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
लोणशी गावातील बापूजी चौंडाई मंदिर हे गावातील फार पुरातन मंदिर मंदिर आहे याचा जीर्णोद्धार व्हावा अशी लोणशीकर नागरिकांची जुनी मागणी होती.मात्र खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून ह्या कामाला दिशा मिळाली. आणि नागरिकांचे स्वप्न पूर्ण झाले.आणि ना भूतो ना भविष्यती ..! असा सोहळा लोणशी गावात पार पडला.यामध्ये ७ जून रोजी पहिल्या दिवशी दुपारी ३ वाजता ५१ सुवासिनी च्या कळशासमवेत कलश मिरवणूक,त्यानंतर मूर्तीसंस्कार,धान्यादिवास,जलाधीवास,शयानिवास,पुष्पाधिवास,महाप्रसाद, प्रासादिक भजन असे कार्यक्रम पार पडले.
तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ८ जून रोजी.पहाटे पासूनच कार्यक्रमांची सुरुवात होती त्यामध्ये पहाटे:६:३० वाजल्यापासून ध्वजारोहण, मान पान विडा,गणेशपूजन ,पुण्यहवाचन,मातृका पूजन,चौसष्टकात्यायनी पूजन, सर्वतोभद्रमंडळ, लिंगतोभद्रमंडळ, सप्तचिंरंजीव पूजन,नवग्रह त्यानंतर हवन प्रारंभ आणि नंतर रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाला .तर यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार आदीती तटकरे देखील उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न झाला
ज्ञानभास्कर प. ब्र. १०८ श्री गुरू महादेव शिवाचार्य वाईकर महाराज मठ संस्थान वाई-सातारा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे,आमदार आदिती तटकरे यांच्यासह मा. ता. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे, राष्ट्रवादीचे नेते इकबाल धनसे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव,मा. पं. स.सदस्य. शैलेश भोनकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला आघाडी अध्यक्षा संगीता बक्कम, बाळाराम(काका) नवगणे, अंकुश खडस, राजेंद्र शिर्के, रा. यु. जि. उपाध्यक्ष.शादाब गैबी, व लोणशी ढालघर पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व सोहळ्याचे पौरोहित्य मंदार स्वामी अनंत जंगम,निलेश स्वामी अनंत जंगम,महादेव स्वामी लक्ष्मण जंगम,संकेत स्वामी दिलीप जंगम,प्रणव स्वामी जंगम.यांनी केले. ८जून रोजी सायंकाळी कालभैरव भजनी मंडळ कळमजे,व सोमजाई भजनी मंडळ राजीवली (खडतर भावकी)यांच्या सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम देखिल पार पडला.लोणशी गावात झालेल्या श्री बापूजी चौंडाई मंदिर जिर्णोद्धार सोहळ्यादरम्यान माणगांव तालुक्यातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ लोणशी,व शिवप्रेरणा कला क्रीडा मंडळ लोणशी मधील सर्व सदस्य व ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली. व सोहळा आनंद व उत्साहात पार पडला.




0 टिप्पण्या