बालिंगा कात्यायनी ज्वेलर्स दरोडाप्रकरणी दोन आरोपी ताब्यात; सुमारे 29,88,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 बालिंगा कात्यायनी ज्वेलर्स दरोडाप्रकरणी दोन आरोपी ताब्यात; सुमारे 29,88,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त.


पोलीस प्रवाह न्यूज 

कोल्हापूर : दि. १० - करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या कात्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा गोळीबार करत फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सतीश पोवाळकर आणि विशाल वरेकर अशी त्यांची नावे आहेत. 

त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 22 लाखाचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल स्विफ्ट कार असा सुमारे 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. परराज्यातील अन्य चौघांच्या मदतीने हा दरोडा टाकला असल्याचे निष्पन्न झाल. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या