सिद्धनेर्ली तालुका कागल येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर अभ्यासाला पर्याय नाही- पोलीस अधीक्षक स्वप्निल माने
पोलीस प्रवाह न्यूज
सिद्धनेर्ली- दि. ७- समाज विकास केंद्र संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका २०१२ पासून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धनेर्ली गावामध्ये कार्यरत आहे. या संस्थेमार्फत गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक असे अनेक उपक्रम वर्षभराच्या कालावधीमध्ये राबवले जातात. दि. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वप्निल माने साहेब (आयपीएस अधिकारी) यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना स्वप्निल माने म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपली आवड जपत भविष्यातील करिअर निवडावे, स्पर्धा परीक्षा देत असताना प्लॅन बी देखील तयार ठेवावा, वर्षभरामध्ये किमान 2२पुस्तके वाचावी पण काय वाचावे हेही ठरवावे. आपल्या वाचनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात महापुरुषांची पुस्तके वाचावीत. देश घडवायची जबाबदारी आपल्यावर आहे हे आपण लक्षात ठेवून आपलं जीवन जगलं पाहिजे, स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर अभ्यासाला पर्याय नाही.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ए,पी सारंग सर पोवार मॅडम, कॉम्रेड शिवाजी मगदूम, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक उमेश मगदूम यांनी तर सूत्रसंचालन व आभार विवेक पोतदार यांनी केले.



0 टिप्पण्या