पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीमध्ये जागतिक सुजाण नागरिकत्व सप्ताह साजरा

 पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीमध्ये जागतिक सुजाण नागरिकत्व सप्ताह साजरा

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.-१७- पोस्को कंपनी दरवर्षी सर्व जागतिक ठिकाणी ग्लोबल गुड सिटीझनशिप वीक (कर्मचारी स्वयंसेवी कार्यक्रम) साजरा करते आणि कर्मचार्यांना स्वयंसेवा करण्यास प्रोत्साहन देऊन विविध उपक्रम राबवून घेते यावर्षी "ग्लोबल गुड सिटीझनशिप वीक" कालावधी ९ ते १६ जून २०२३ असा होता. पोस्को  महाराष्ट्र स्टीलने या आठवड्यात कंपनी परिसरातील गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.

 ४ शाळांमध्ये शैक्षणिक समर्थन कार्यक्रम अंतर्गत - विद्यार्थ्यांना विज्ञान आणि नवकल्पना याकडे प्रवृत्त करण्यासाठी सोलर बोट, सोलर कार, सस्पेन्शन ब्रिज, मॅग्नेट पॉवर, सेल्फ-पॉवर्ड फ्लॅशलाइट, हेडफोन इ. यासारखे विज्ञान प्रयोग आयोजित केले होते. १०५ विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संचचे वाटप, ज्यामध्ये स्कूल बॅग, स्टेशनरी, रंग पेटी, रंगीत खडू आणि चित्रकलेची वही इत्यादी वाटप करण्यात आले.
कंपनीच्या कर्मचार्‍यांनी परिसरातील ७ गावांतील १९ शेतकर्‍यांच्या जागेमध्ये आंबा आणि केळीची झाडे सहभागी पद्धतीने लाऊन हा उपक्रम पूर्ण केला, शेतकऱ्यांनी खड्डे तयार केले व रोपांची व्यवस्था पोस्को कंपनीतर्फे करण्यात आली. एकूण २५७ रोपांची लागवड करण्यात आली यात पोस्कोच्या उपव्यवस्थापकीय संचालकांसह ३६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

या सप्ताहाच्या आयोजनामुळे भागाड, विळे आणि शिरवली ग्रामपंचायतीतील अनेक विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता आला असा अभिप्राय या प्रसंगी कंपनी प्रतिनिधींनी व्यक्त करत सर्व सहभागी गावकरी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या “ग्लोबल गुड सिटीझनशिप वीक” उपक्रमांव्यतिरिक्त पोस्को महाराष्ट्र स्टील आपल्या नियमित शाश्वत CSR उपक्रमांतर्गत वर्षभर कार्यक्रम आयोजित करत असते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या