माणगांव पोलीस स्टेशन तर्फे आरोग्य शिबीर व नशामुक्त भारत रॅली
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १७- माणगांव पोलीस ठाणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. रायगड पोलीस अंतर्गत माणगांव पोलीस ठाणे तर्फे आरोग्य शिबीर व नशामुक्त रॅलीचे आयोजन दि. १७ जून रोजी करण्यात आले होते.
रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार विजय सिंह पोंदकुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त रॅलीत अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव मधील विध्यार्थी व शिक्षक वृंद देखील सहभागी झाले होते.
माणगांव पोलीस ठाणे ते माणगांव बस स्थानक अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांकडून नशामुक्ती बाबत घोषणाबाजी करण्यात आली. माणगांव पोलीस ठाणे येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात एकूण ३२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. माणगांव बस स्थानक येथे पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व नागरिकांना नशेबाबत तोटे सांगून इतरांना नशे पासून परावृत्त करणे शपथ घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतिष आस्वर, नितीन मोहिते, नवनाथ लहांगे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश आघाव, किर्तीकुमार गायकवाड, पो. शि. राम डोईफोडे, मयूर पाटील आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




0 टिप्पण्या