अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्या सचिव पदी संदीप पोतदार यांची निवड
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर-विवेक पोतदार दि. १८- अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीची नुकतीच त्रिमासिक बैठक संपन्न झाली. सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्ष ही सुवर्णकार समिती कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी गुणगौरव समारंभ, समाजातील गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, पूरग्रस्त अन्नदान वाटप, सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांच्यासाठी मार्गदर्शन मिळावे इत्यादी अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून संपन्न झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या संघटनेच्या बैठकीमध्ये संदीप पोतदार रेंदाळकर यांची सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.
संदीप दत्तात्रय पोतदार हे संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असून प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आले आहेत. समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम त्यांनी आपल्या भागात घेतलेले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांची सचिव पदी निवड करण्यात आली असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार (कुरुंदवाडकर) यांनी बोलताना सांगितले.
यावेळी निलेश पोतदार यांची MSEB मध्ये जुनियर असिस्टंट पदी बढती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार(कुरुंदवाडकर), निलेश पोतदार (कुंभोजकर),अविनाश मुखरे, अजित पोतदार,प्रशांत पोतदार तसेच सर्व संचालक, विभाग प्रमुख व समाज बांधव उपस्थित होते.




0 टिप्पण्या