मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर कुणेगाव पुलावर केमिकलच्या टँकरला भिषण आग

 मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर कुणेगाव पुलावर केमिकलच्या टँकरला भिषण आग

मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

पोलीस प्रवाह न्यूज

लोणावळा- दि. १३- मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अपघात होऊन टँकर रस्ते मध्ये पलटी झाला व टाकेला भीषण आग लागल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आगीचे लोट उसळले आहेत. ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कुनेगाव पुलाजवळ घडली आहे. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

 टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले. यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली असून एका दुचाकी गाडीवर आगीचा लोट पडल्याने तीन जण गंभीरित्या जळाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या