श्रीराम क्रीडा मंडळातर्फे बालसंस्कार व क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित

 श्रीराम क्रीडा मंडळातर्फे बालसंस्कार व क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित 



पोलीस प्रवाह न्यूज

 लोणावळा- दि. १३- श्रीराम क्रीडा मंडळ गवळीवाडा, लोणावळा तर्फे दिनांक २० मे ते ११ जून 2023 पर्यंत विविध गटात संस्कार शिबिराचे आयोजन लोणावळा  नगरपरिषद मैदान, गवळीवाडा, लोणावळा येथे घेण्यात आले होते. त्याचा सांगता समारंभ दि. १२ जून रोजी करण्यात आला. 

या संस्कार शिबिरात ३ गट पाडण्यात आले होते. यात प्रामुख्याने  बालवाडी, पहिली ते चौथी, पाचवी ते नववी असे गट होते. सायंकाळी पाच ते सात या वेळेत दररोज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने, कवायत, कथाकथन, मनोरंजन, गुणदर्शन, चिंतन, मनोरंजनात्मक खेळ, संस्कारकथा, देशभक्तीपर गीते, गीत गायन, खेळातून प्रबोधन, लंगडी, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, दोरी उड्या, लेझिम  ह्याचे मार्गदर्शन चव्हाण सर करत होते. आई-वडिलांच्या दररोज पाया पडणे आधी माहिती दिली. बालग्राम आश्रम मधील क्रीडा शिक्षक श्री. संपत चव्हाण सर व त्यांच्या सौ. चव्हाण  यांचे मार्गदर्शन लाभले यांना श्री राम मारुती सेवाभावी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. दिलीप लोंढे, श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महादेव गवळी, श्री नंदूभाऊ कडुसकर हे उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करत होते. दररोज शिबिर संपल्या वेळी मुलांना खाऊ, फळे व पेय वाटप होत होते  या खाऊवाटपाचे मानकरी गणेश शिंदे, विशाल गवळी, मंगेश बालगुडे, दर्शन लोंढे, विलास खांडेभरड, महादेव गवळी, सुनील मोगरे, मनोज गवळी, प्रशांत गवळी, किशोर अवशिकर, दिनेश जानुबस, निखिल कवीश्वर,  राजू भिकोबा गवळी, सुधीर  शिर्के, नंदू राशिनकर, अशोक गवळी, रमेश पिल्ले, परेश घरदाळे, प्रविण मोगरे,  स्वाती संतोष लोखंडे,  प्रकाश रगडे, विनोद मोरे,  भरत खंडेलवाल,  मनिष गवळी, योगेश गवळी, निलेश लोखंडे,  संतोष सरदेशमुख (अण्णा )  निलेश रगडे, आकाश परदेशी, राजू बिडकर,   अमोल शेडगे, गणेश कडू,  गणेश आखाडे, सारंग माने,  सागर पवार, सनी शिर्के, अशोक नाईक, विकास जाधव आदींनी सहकार्य केले. 

 सोमवार  दिनांक १२ जून  रोजी सांगता समारोह करण्यात आला. यावेळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे लोणावळा शहर पोलीस निरीक्षक श्री. सिताराम डुबल, श्री. पांडुरंग तिखे  (अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ) श्री. विशाल विकारी (अध्यक्ष लोणावळा शहर पत्रकार संघ) अदित्य व्यास, श्री. चौधरी सर,  श्री दिलीप लोंढे (अध्यक्ष श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट) महादेव गवळी ( अध्यक्ष श्रीराम क्रीडा  मंडळ) मनोज मोगरे (विश्‍वस्त) मोहन औरंगे (विश्वस्त) नितीन अग्रवाल (विश्वस्त) यतिन अकोलकर( विश्वस्त) निखिल कविश्वर (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) सुधिर शिर्के ( मा.उपनगराध्यक्ष) श्रीमती  सिंधूताई कविश्वर (मा. उपनगराध्यक्षा) सौ. सुवर्णा अकोलकर (मा. उपनगराध्यक्षा) श्रीमती नीलम कडू, अनिल गवळी, (विश्वस्त)  नंदू कडूसकर, राजू भिकू गवळी,  धिरूभाई कल्याणजी, (माजी उपनगराध्यक्ष) आकाश परदेशी, किसन गुप्ता, मारुती जानुबस, अतुल जोशी,  मनेष गवळी,  हेमंत मिंढे,अक्षय गवळी, गणेश कडू, सूर्यकांत औरंगे, प्रशांत गवळी,  दिनेश जानुबस, गोविंद खंडेलवाल,  चंद्रकांत गवळी,  निलेश लोखंडे,  योगेश गवळी,  अमोल शेडगे, अर्जुन बिडकर, नकुल बिडकर, आकाश परदेशी, किसन गुप्ता, मारुती जानुबस, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  पांडुरंग तिखे, विशाल विकारी,  महादेव गवळी श्री. संपत  चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.  यावेळी मुलांकडून मनोरंजनपर गीत व कथा सादर करण्यात आल्या. मंडळाने हा उपक्रम अतिशय चांगल्याप्रकारे राबविला व मुलांना दूरचित्रवाणी व  भ्रमणध्वनी पासून दिवसातून तीन ते चार तास लांब ठेवत त्यांच्यावर बौद्धिक, शारीरिक, मानसिक अशाप्रकारे चांगले संस्कार केले. त्याबद्दल सर्वांनी मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगेश बालगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. निखिल कविश्वर यांनी केले.  मंडळातर्फे सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र वाटप व विशेष बक्षिसे देण्यात आली. तर हभप श्रीमंत रमेशसिंह व्यास यांच्याकडून प्रत्येकास  शाळेची बॅग व जेली पॅकेट, श्री. भरत  खंडेलवाल यांचेकडून रायटींग पॅड चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व  पदाधिकारी व सर्व सदस्यांनी मेहनत  घेतली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या