मुरगुड पोलीस स्टेशन मार्फत सुवर्णकार आणि सराफ यांची बैठक संपन्न

 मुरगुड पोलीस स्टेशन मार्फत सुवर्णकार आणि सराफ यांची बैठक संपन्न



पोलीस प्रवाह न्यूज

मुरगुड- दि. १३- मुरगुड पोलीस स्टेशन अंतर्गत गावांमधील मुरगूड शहरासह सुवर्णकार आणि सराफ यांची बैठक घेऊन मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय विकास बडवे  यांनी  काही मार्गदर्शक सुचना केल्या. ते बोलताना म्हणाले की व्यापारी बांधवांनी आपापल्या दुकानात सोन्या-चांदीचे मालाची काळजी घेणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बाहेरील बाजू व मधील बाजू लावून आपल्या दुकानाची होणारी चोरी टाळण्यासाठी कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. तसेच दुकानात अनोळखी व्यक्ती आल्यास त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या मौल्यवान वस्तू चोरल्या जाणार नाही. दुकानाबाहेर संशयास्पद व्यक्ती असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे, याची काळजी घेणे तसेच आपल्या सोन्या चांदीचे मौल्यवान वस्तू याची सुरक्षिता ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळेस सर्व वस्तू व्यवस्थित ठेवणे तसेच आपणास शक्य असल्यास सुरक्षा रक्षकाची नेमणूक  करणे रात्री दुकान बंद करताना कुलूप व्यवस्थित लावणे चोरीचा माल विक्रीसाठी  कोणी घेवून आल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला कळविणे रात्रीची पेट्रोलिंग साठी येणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे संशयित व्यक्ती वाटल्यास पोलीस स्टेशनला कळवावे तसेच कुणीही चोरीचा माल किंवा संशयित व्यक्ती कडून सोने चांदी मोड घेवू नये, पोलीस आणि सराफ यांच्यातील माहितीसाठी मोबाईल ग्रुप तयार करणे अशा अनेक मार्गदर्शक सूचना सुवर्णकार आणि सराफ यांना दिल्या.    

 यावेळी मुरगूडचे पीएसआय कुमार ढेरे यांच्यासह सोनार समाजातील मुरगुड शहर सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष नंदू बेळेकर , किरण गवाणकर, किशोर पोतदार, प्रदीप वेसनेकर, प्रसाद रेंदाळे, निलेश वसणेकर, सिद्धेश पोतदार, रमेश वळीवडेकर इत्यादी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या