इंदापूर विभागात सापडले अनोळखी पुरुष जातीचे प्रेत
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १६- माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १२ मे रोजी रात्री ११ वा. च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर मौजे वावे दिवाळी फाट्याजवळ पूर्व बाजूस झाडी झुडपाच्या बाजूला वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे. प्रेताचे वर्णन अंगावर पांढऱ्या मळकट रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट असून याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू र. नं. २२/२०२३ कलम १७४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आघाव करीत आहेत. सदर मयताचे कोणी नातेवाईक असल्यास माणगांव पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन माणगांव पोलिसांनी केले आहे.



0 टिप्पण्या