लोणेरे विभागात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती

 लोणेरे विभागात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती 



शिवसेना ठाकरे गट युवासेना लोणेरे विभाग अध्यक्ष मोनिष टेंबे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष अक्षय अंधेरे यांचा असंख्य कार्यकर्तेसह शिवसेनेत प्रवेश

थोड्या दिवसात  राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणेरे गोरेगांव विभागातील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होणार


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १६- सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे भरत  गोगावले. लोणेरे विभागात लाखो रुपयाचा विकास आ. भरत गोगावले यांनी केला आहे. त्यामुळे विकास फक्त आमदार गोगावलेच करून शकतात याचा विचार करुन लोणेरे युवासेना अध्यक्ष शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांचे कट्टर समर्थक शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटाचे मोनिष टेंबे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे न्हावे गावचे माणिकराव जगताप समर्थक  राष्टवादी युवाअध्यक्ष अक्षय अंधेरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते घेऊन आमदार गोगावले यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी या निवास्थानी जाऊन आमदार यांच्या कार्यप्रणाली विश्वास ठेऊन  शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश केला. 

या वेळी माणगांव तालुका माजी सभापती महेंद्र तेटगुरे, प्रताप घोसाळकर, रविंद्र टेंबे, संजय पवार, दिलीप टेंबे, दिपक करकरे, तसेच शिवसेना लोणेरे विभागातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परेश रमेश टेंबे शाखाप्रमुख लोणेरे उध्दव  ठाकरे गट, रामचंद्र भागोजी म्हसकर उप तालुका प्रमुख भाजपा, मालु रामचंद्र  म्हप्रालकर, श्रीधर शंकर बटवले न्हावे, विजय यशवंत तळवटकर, संतोष कदम, मंदार महेश करदेकर, अनिकेत अशोक कासार,  राज राजेश दिवटकर, राहुल चव्हाण, राहुल चव्हाण, गोविंद शिंदे, हर्षद कडू, पंकज केंद्रे, ओमकार बागुळ, किरण रामचंद्र म्हसकर, किशोर जाधव,  बाळाराम काशिद, आशा मुकणे ,सुनिता जाधव ,निर्मळा मुकणे, समिर मनके,  रविंद्र सुतार,  सुरेश दगडु कोळी, दौलत जाधव , रामचंद्र वाघमारे,  गोपाळ जाधव हिरा जाधव, भिकु कोळी, विष्णु कोळी, सुनिणा काटकर, बबन कोळी, राजेश कोळी, मंगेश जाधव, श्रीपत कोळी, बाबु हिलम, सुमित ढेपे, सुजित भोईर, नितेश जाधव, पौढरी करकरे ,सुनिल शिर्के, अनिकेत भोस्तेकर असे अनेक गावातू वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्तेनी  यावेळी प्रवेश केला. 
यावेळी आमदार गोगावले यांनी प्रवेश कार्यकर्ते ना सांगितले कि, सर्व प्रवेश कार्यकर्तेचे शिवसेना पक्षात स्वागत असून  साम-दाम-दंड-भेद सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू चिंता आणि काळजी करण्याचे कारण नाही. आपली सर्व विकास कामे  पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच आपले कटिबद्ध आहोत. यावेळी प्रवेश कर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोणेरे विभागात विकासकामे करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आलो आहोत, आणि शेवटपर्यंत आपल्या सोबत राहू फक्त तुमची आम्हाला साथ हवी असे प्रवेशकर्त्यांनी  सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या