रोटरी क्लब आँफ मुंबई तर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगांवला अत्याधुनिक ऑपरेशनसाठी सियाम मशीन भेट
९ जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग किट भेट
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २५- रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लबच्या अध्यक्षा काजल थडानी, संचालक आणि माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाकरिता दि. २४ जून रोजी अत्याधुनिक ऑपरेशन साठी सियाम मशीन देण्यात आले. तसेच या आधी २०२२ मध्ये अत्याधुनिक डोळ्याचे ऑपरेशन मशीन व ऑपरेशन विभागाचे काम देखील रोटरी क्लब ऑफ मुंबई च्या मार्फत करण्यात आले असून तालुक्यातील अनेक रुग्णांना याचा मोठा फाईदा होत असल्याचे डॉ. शंतानु डोईफोडे यांनी सांगितले तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पो. नि. राजेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच क्लबच्या अध्यक्षा काजल थडानी, दत्ताराम शिंदे, आरती शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गोमसाले, डॉ. शंतनु डोईफोडे, डॉ. समीर शेलार, डॉ. पटेल, डॉ. देशमुख, समाजसेवक विजय शिंदे, कुमशेत सरपंच सचिन कदम आदी रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रल चे सन्मानिय पदाधिकारी दत्ताराम शिंदे यांनी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधा करिता काही साधने उपलब्ध करून देता येतील याबाबत डॉक्टर व प्रशासन यांचे कडून आढावा घेतला होता. रोटरी क्लब ही संस्था महानगरी मुंबई शहरात कार्यरत आहे. क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम पांडुरंग शिंदे व आरती दत्ताराम शिंदे हे माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे रहिवाशी आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक व सरकारी रुग्णालयात आवश्यक असणारी साधन व्यवस्थांची त्यांना चांगली माहिती होती. या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या मातृभूमी असलेल्या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम हाती घेवुन क्लबच्या सहकार्याने सेवाभावी काम करीत आहेत.
तसेच तालुक्यातील वडघर मुद्रे, नांदवी, कुशेडे, कुमशेत, ढालघर, निळगूण आदिवासीवाडी, हरकोल बौद्धवाडी, नांदवी आदिवासी वाडी या ९ शाळांना आँनलाईन शिक्षणाकरिता ई-लर्निंग किट दिले . तसेच पन्हळघर बुद्रुक येथील आदिवासीवाडी वरील रमेश घोग्रेकर या आदिवासी बांधवाला घर दुरुस्तीसाठी ५०००० रु. देण्यात आले होते. त्याचे घर पूर्ण झाले असून रोटरी क्लब मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते उदघाटन देखील करण्यात आले. यामध्ये पत्रकार राम भोस्तेकर यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे दत्ताराम शिंदे यांनी सांगितले.





0 टिप्पण्या