महसूल विभाग माणगावच्या वतीने योग दिन साजरा
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.२१- आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी महसूल विभाग माणगावचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्या सूचनेनुसार प्रशासकीय भवनात योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी महसूल विभागातील सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहुन योगा करून योग दिन साजरा करण्यात आला.
या वेळी तहसिलदार विकास गारुडकर, पुरवठा निरीक्षक श्री. माने, सर्व तलाठी, सर्व महसूल कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी योगा चे प्रात्यक्षिके करून हा योग दिन साजरा केला.




0 टिप्पण्या