जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये या खेळाडूंचे घवघवीत यश
सिद्धनेर्ली-दि.२२- वडनगे येथे आयोजित ७ वी जिल्हा स्तरीय कॅडेट (१४ वर्षाखालील) आणि ज्युनिअर (१७ वर्षाखालील)स्पर्धेमध्ये सिद्धनेर्ली आणि वंदुर च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये कॅडेट गटात सुरभी सुधाकर मेटील व समर्थ रणदिवे यांना सुवर्ण पदक तर मृणाल पाटील आणि ऋग्वेदा जंगटे यांना कास्य पदक मिळाले.
ज्युनिअर गटात वैष्णवी संपतराव पाटील, आर्पिता अर्जुना आडुरे, अनुजा रणजित घराळ यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. तर सृष्टी शिवाजी लाड, सार्थक संभाजी घराळ, सत्यजीत माणिक गोनुगडे यांना रौप्य पदक आणि रत्नदीप अजित पाटील याला कास्य पदक मिळाले.
विजेत्या ज्युनिअर गटाच्या खेळाडूंची निवड रत्नागिरी येथे तर कॅडेट गटाच्या मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धसाठी झालेली आहे. स्पर्धेमध्ये प्रणव घराळ, समर्थ मोरे, राज सुतार यांनीही सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे विजयचिन्ह मिळाले आहे. त्यांना उमाजी पोवार सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



0 टिप्पण्या