मुरगूड पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गावरून केले पथ संचलन.
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापुर- ओंकार पोतदार : दि. १२ - कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसह मुरगुड पोलिसांनी शहराच्या मुख्य मार्गावरून संचलन केले. दरम्यान, सायंकाळी शांतता कमिटीची बैठक सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि पीएसआय कुमार ढेरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
कोल्हापुरातील दंगलीनंतर हिंदू- मुस्लिम समाजात असलेले संशय आणि भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुरगूड पोलिसांनी शहराच्या मुख्य मार्गावरून संचलन केले. ग्रामदैवत अंबाबाई मंदिर, हुतात्मा तुकाराम चौक, शिवतीर्थ, राजीव गांधी चौक, राणा प्रताप चौक ते नाका नंबर १ वरुन पोलीस स्टेशन या मार्गावर पोलिसांचा ताफा मार्गक्रमण झाला. या संचलनामध्ये २ अधिकारी, १५ पोलीस अंमलदार आणि १५ होमगार्ड असे सहभागी झाले होते.
दरम्यान, सायंकाळी मुरगुड पोलीस ठाण्यात हिंदू- मुस्लिम बांधवांचा समावेश असलेल्या शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी समिती सदस्यांनी धार्मिक तेढ होणारी कोणतीही घटना क्षुल्लक न समजता तातडीने पोलिसांशी संपर्क साधून अशा वृत्तीपासून समाज स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी सर्वानी घेण्याचे आवाहन करण्यात आले.



0 टिप्पण्या