माणगांव शहरातुन १ लाख ९५ हजारांचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला.

 माणगांव शहरातुन १ लाख ९५ हजारांचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : २ - माणगांव शहरात होणाऱ्या मोठ्या चोरांसोबत आता भुरट्या चोरांनी देखील सद्या डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.माणगांव शहरातील निजामपूर रोडवरील हायवेनजीक असणाऱ्या एका उघड्या घरात घुसून चोरी करून अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख ९५ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

    याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की ,३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास माणगांव निजामपूर रोडवरील भारतगॅस ऑफिस शेजारी जाधव चाळ येथे राहणाऱ्या घटनेतील फिर्यादी नंदाताई दीपक जाधव यांच्या उघड्या घरात घुसून कोणीतरी अज्ञात चोरट्याने किचनमधील फ्रीजवर ठेवलेल्या पर्स मधून १ लाख ९५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व रोख रक्कम २१० घेऊन पोबारा केला आहे.

    याप्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ .गु. रजी नं.१४३/२०२३ भा. दं. वि .स.कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स. ई किर्तीकुमार गायकवाड हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या