महाराष्ट्र दिनानिमित्त मावळा स्वराज्याचा संघटने मार्फत पन्हाळगडावर स्वच्छता मोहिम

महाराष्ट्र दिनानिमित्त मावळा स्वराज्याचा संघटने मार्फत पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ०२- माणगाव तालुक्यातील लोणेरे पासून तीन किलोमिटर अंतरावर असणाऱ्या आणि स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्या जवळपास असणाऱ्या पन्हळघर बुद्रुक गावाजवळ पन्हळागडावर दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त किल्ले (पन्हळघर दुर्ग) वर मावळा सावराज्याचा प्रतिष्ठान तर्फे मोहीम क्र. ११ राबवण्यात आली.  मावळा स्वाराज्याचा प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी आणि सभासदांनी दिलेल्ल्या शब्द पूर्ण करून जून महिन्याच्या अगोदर गडावरील संपूर्ण टाक्या गाळाने मुक्त कारण्यात आल्या. या पावसाळ्या पासून पुढील येणारे वर्ष गडावर १२ ही महिने  पाणी उपलब्ध होणार अशी अशा सभासदानी व्यक्त केली. गडावर  येणाऱ्या पर्यटकासाठी पाणी पिण्याची व्यवस्था गडावर व्हावी या साठी येणाऱ्या पहिल्या पावसात  टाके संपूर्ण स्वछ धुवून काढण्याची संकल्पना  संघटने मार्फत आखण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गडाची काही भाग ढासलेली आढळून आले आसून यापुढे त्याची सुद्धा येणाऱ्या काही ववर्षात डागडुगी  करण्याचे प्रयत्न संघटने मार्फत येणार आसल्याचे सांगितले.


दि. १ मे महाराष्ट्र दिनी झालेल्या मोहिमेला प्रतिष्ठानचे फक्त ६ सभासद उपस्थित होते. तरी त्यांनी कसलीच कमी भासून देता सलग गडावर ४ तास न थांबता काम करून या मोहिमेमध्ये संपूर्ण टाके पूर्ण साफ करायच्या उद्धेशाने उतरले आणि टाके पूर्ण स्वच्छ करून थांबले. टाकेमध्ये मोठ मोठे दगडी धोंडे सापडले. संख्या बळ कमी असल्यामुळे त्यांना वर काढणे शक्य झाले नाही तरी ते पुढील मोहिमेला बाहेर काढून ठेवण्यात येतील. शेवटपर्यंत किल्ले पन्हळगडसाठी घाम गाळून संवर्धन करत राहू असे मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठानच्या सभासदांच्या मुखातून बोलण्यात आले. यावेळी मावळा स्वराज्याचा संघटनेचे पन्हळघर बुद्रुक ग्रामस्थ तसेच सरपंच संतोष वातेरे, उपसरपंच सुजन शिगवण, माजी उपसरपंच राम भोस्तेकर, माजी उपसरपंच रामदास जाधव, संतोष मेरुकर आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या