इंदापूर विभागातुन १ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरीला

 इंदापूर विभागातुन १ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरीला

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ०३- माणगांव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू आहे .हे चोरटे बंद घरे, कन्स्ट्रक्शन कंपन्यांचे स्टील यार्ड, बंद कन्स्ट्रक्शन साईड अशा प्रकारची वेगवेगळी ठिकाणे लक्ष्य करत आहेत. अशाच प्रकारे इंदापूर विभागातील धरणाची वाडी गावच्या हद्दीतील बंद कंपाउंडमध्ये घुसून अज्ञात चोरट्यानी तब्बल १ लाख ४८ हजारांचे सामान लंपास केले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक २२ एप्रिल ते २७ एप्रिलच्या दरम्यान घटनेतील फिर्यादी आशिष अनंत दळवी यांच्या धरणाचीवाडी येथील कंपाउंडमध्ये घुसून १ लाख रुपये किंमतीचे लोखंडी ऑफिस कंटेनर, रु. ८ हजार किंमतीचे ऑफिस कामाचे टेबल, रु. ३ हजार किमतीच्या २ ऑफिस व्हील खुर्च्या, रु. १० किंमतीचे गॅस कटर, १ वेल्डिंग मशीन, २ ग्रायंडर, १ हायड्रोलिक पाईप, ४ पाने, गाडीचे इंजिन, ५ हजार किंमतीचे एफ सेंटेक्स पोर्टेबल बाथरूम, ४हजार किंमतीचे २० लोखंडी पाईप, १५ हजार किमतीचे निळ्या पांढऱ्या रंगाचे पोर्टेबल बाथरूम, रु. ३ हजार किंमतीचे पत्र्याची शेड आणि लोखंडी पाईप असे एकूण १ लाख ४८ सामान चोरीस नेले आहे.

या प्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. रजि. नं. १३५/२०२३ भा. दं. वि. स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. दर्शन दोडकुळकर हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या