माणगांवात दिवसाढवळ्या चैन चोरी
नागरिकांनी चोराला दिला चांगलाच चोप
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १८- माणगांव हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असून जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा माणगांव तालुक्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. तालुक्यातील नागरिकांचे राहणीमानात देखील बदल होत आहे. माणगांव शहराचा विकास होत असला तरी शहरात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. अशीच एक घटना माणगांव शहरात घडली असून दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील चैन चोरण्याचा प्रकार घडला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. १८ मे रोजी माणगांव बाजारपेठेतून सुषमा मेहता या नातेवाईकांकडे जात होत्या. बँक ऑफ इंडिया बिल्डिंगजवळ आल्यावेळी चोराने त्यांच्या गळ्यातील चैन खेचून घेत तिथून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असताना सुषमा मेहता यांनी प्रसंगावधान दाखवून आरडाओरड केला असता नागरिकांनी चोराचा पाठलाग करीत राजस्थान कॉलनी येथे पकडले. चोराला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. चोराने आणलेली ऑटो रिक्षा क्र. एम एच ४६ बी डी ८४२० सहित चोराला माणगांव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करीत आहेत.

.jpg)

0 टिप्पण्या