माणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बाबटा

 माणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बाबटा

सभापतीपदी शेकापचे रमेश मोरे तर उपसभापती पदी शेकापचेच अल्लाउद्दीन सनगे, राष्ट्रवादी ला ठेंगा.???

माणगांव कृ. उ. बाजार समितीवर महाविकास आघाडी नाही तर शेकाप आणि माणगांव विकास आघाडी एकत्र

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १८- माणगांव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या चार तालुक्यांची बाजार समिती असलेल्या माणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बावटा फडकला आहे. ही निवडणूक १८ मे रोजी माणगांव कृ उ बाजार समिती माणगांव कार्यालयात पार पडली. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माणगाव सहाययक निबंधक सहकारी संस्था अमोल निरडे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत माणगांव  कृ. उ. बाजार समितीच्या  झालेल्या निवडणूकित सभापती पदी शेकाप माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे  तर उपसभापती पदी अल्लाउद्दीन सनगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


या समितीमध्ये एकूण १८ सदस्यांचा समावेश आहे. या १८ मध्ये शेकापचे १२ सदस्य बिनविरोध होते. १८ सदस्यांमध्ये सोसायटीमधून ११ सदस्य निवडून द्यायचे असतात. त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून ७  सदस्य व २ विमुक्त भटक्या जाती, १ ओबीसी असे ११ सदस्य व हमाल माथाडी १ असे मिळून १८ पैकी १२ सदस्य शेकापचे बिनविरोध निवडुन आले होते. तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून ४ त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४  व्यापारी दलाल/अडते२ सदस्य निवडले जातात ते दोन्ही (शिंदे गट) शिवसेनेचे बिनविरोध देण्यात आले होते. 

बिनविरोध १२ झालेले शेकाप चे कृ. उ.बा. समिती माणगांव

१)नाझनीन अस्लम राऊत(महिला)

२)गौरी भाऊ पैर(महिला)

३)सुषमा लिलाधर रिकामे(वि. भ. ज.)

४)गिजे विनायक राऊत(ओ. बी. सी.)

५)रमेश पांडुरंग मोरे(सर्वसाधारण)

६)हसनमिया अलतीफ बंदरकर(सर्वसाधारण)

७)कौस्तुभ विद्याधर धामणकर(सर्वसाधारण)

८)नरेश लक्ष्मण दळवी(सर्वसाधारण)

९)दिलीप विनायक उतेकर(सर्वसाधारण)

१०)महेश गजानन सुर्वे(सर्वसाधारण)

११)अल्लाउद्दीन अमर सनगे(सर्वसाधारण)

१२)स्वप्निल सिताराम दसवते(हमाल माथाडी) 


राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य.(ग्रामपंचायत)

१)पवार परशुराम चंदर (अनु जाती/जमाती ग्रामपंचायत)

२)किर सचिन नंदाकर (आ.दु.घ.ग्रामपंचायत).

३)गोळे अंकुश रघुनाथ( सर्व.ग्रामपंचायत).

४).गोरेगावकर चंद्रकांत विष्णू (सर्व.ग्रामपंचायत). 

हे बिनविरोध सदस्य म्हणून राष्ट्रवादी कोट्यातून निवडून आले होते. तर शिंदे गट (शिवसेना) कोट्यातून प्रमोद रामचंद्र घोसाळकर व संतोष मेहता यांना बिनविरोध सद्सयत्व देण्यात आले होते. ही माणगांव कृ. उ. बा.  समिती निवडणूक महाविकास आघाडी म्हणून करण्यात आलेली नसून माविकास आघाडी म्हणजेच माणगांव तालुका विकास आघाडी म्हणून करण्यात आल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शेकाप चे मा.आम.सुभाष (पंडीतशेठ)पाटील यांच्याकडे बोलून दाखविले आहे. याबाबतीत पत्रकारांकडून मा. आम. पंडीतशेठ पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की,आमचा अजून काडी-मोड झालेला नाही आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत आणि पक्षश्रेष्ठींनी जर राष्ट्रवादी ला उपसभापती पद द्यायचे ठरविले नसेल तर आम्ही काय करणार?त्यामुळे माणगांव कृ उ बाजार समितीची दोन्ही पदे शेतकरी कामगार पक्षकडेच आहेत. या निवडणुकीत शेतकरी कामगार   पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल माणगांव शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांचे मा.आम जयंत पाटील यांनी तोंडभरून कौतुक केले. या निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तर बहुसंख्येने दिसत होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चा एक ही बढा कार्यकर्ता किंव्हा पदाधिकारी न दिसल्यामुळे राष्ट्रवादी ला माणगांव मध्ये शेतकरी कामगार पक्षाने कृ उ बाजार समिती निवडणूकित ठेंगा दाखवला आहे ?? अशी चर्चा जल्लोषात सामील झालेल्या कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात ऐकायला मिळत होती.

सदरची निवडणूकित विजय मिळविण्यासाठी आखण्यात आलेली युव्हरचना ही जयंतभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आर डी सी बँक संचालक अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वी पार पडली असून यात शेकाप यश मिळाले आहे. 

यावेळी शेकाप मा. आ. पंडित पाटील, शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, मनसे जिल्हाप्रमुख देवेंद्र गायकवाड, शेकाप जेष्ठ नेते, अस्लम राऊत, शिवसेना श्रीवर्धन क्षेत्र संघटक ऍड. सुशिल दसवते, नगरसेवक सचिन बोंबले, शेकाप नेते स्वप्निल दसवते, संतोष खडतर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ, शेकाप शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बावटा फडकवून शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या