करमाळा तालुका पोलीस स्टेशनमध्ये मान्यवरांच्या हस्ते
पोलीस प्रवाह न्यूज विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
पोलीस प्रवाह न्यूज
करमाळा : गुरुवार दिनांक 25 मे रोजी करमाळा तालुका पोलीस स्टेशन मध्ये पोलीस प्रवाह विशेष अंकाच प्रकाशन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब व यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ करे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,तसेच करमाळा तालुक्याचे सुपुत्र पुणे येथील पार्श्वगायक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार अवचर यांना पोलीस प्रवाह न्यूज़ तर्फे देण्यात येणारा यंदाचा "समाज रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी िद्या विकास प्रतिष्ठानचे श्री विलासरावजी घुमरे सर ,ए पी आय जगदाळे साहेब, मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल , बार्शी येथील एडवोकेट अनमोल वाघमारे ,यांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्रवीण अवचर विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य श्री फंड सर, श्री नाळे सर संघर्ष न्यूज चे पत्रकार सिद्धार्थ वाघमारे,दै,पुढारीचे अशोकराव नरसाळे ,दै लोकमतचे पत्रकार नासिर कबीर, न्यूज पोर्टल चे अशोक मुरूमकर, पोलीस कर्मचारी उपस्थित होते, यानिमित्त पोलीस प्रवाह न्यूज चे संस्थापक तथा संपादक श्री नवनाथ कापले. यांनी दूरध्वनीवरून उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले. गेल्या दहा वर्षापासून पोलीस प्रवाह न्यूज पोलीस बांधवांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून कार्य करत आहे.






0 टिप्पण्या